Ujjwal Nikam | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात बुधवारी निकाल दिला. निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचं म्हटलं. त्यासाठी त्यांनी शिवसेनेची 2018 मधील घटना अमान्य केली. त्याचवेळी दोन्ही गटापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आपल मत मांडलय. त्यांनी ठाकरे गटाला, सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडता येईल, असं म्हटलंय.
उज्वल निकम यांचा ठाकरे गटाला महत्त्वाचा सल्ला
आमदारांच्या अपात्रतेबद्दल 10 व परिष्ट याच्याशी अध्यक्षांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरला होता आणि भरत गोगावले यांचा ग्राह्य धरला नव्हता. अध्यक्षांनी निकालपत्रात सकृतदर्शनी दोन्ही व्हीप ग्राहय धरल्याचत दिसतय. दोन्ही व्हीप ग्राह्य धरण्याला आधार काय? हे संपूर्ण निकालपत्राच वाचन केल्यानंतरच समजेल, असं उज्वल निकम म्हणालेत.
“…ते ठाकरे गटाला सिद्ध कराव लागेल”
पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही, हे वक्तव्य अध्यक्षांनी केलंय. त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतला आहे? आधार नसल्यास ते ठाकरे गटाला सिद्ध कराव लागेल, असं उज्वल निकम म्हणालेत.
निश्चित ठाकरे गटाला याबाबतीत चांगला युक्तीवाद करता येऊ शकतो. व्हीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठाने निकालात प्रतोदपदाबद्दल महत्त्वाच निरीक्षण नोंदवल होतं. अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलाय का? हे तपासाव लागेल, असं उज्वल निकम म्हणाले.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिवसेनेची 1999 सालची घटना ग्राह्य धरली. महत्त्वाच म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती वैध ठरवली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल देताना भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती अवैध ठरवली होती. हा निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदलला.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याचं म्हणत राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AFG | पार्टी केल्यानं किशनची संघातून हकालपट्टी? भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा