Ram Mandir Inauguration | राजकारणी किंवा उद्योगपती नाही! ‘या’ आध्यात्मिक गुरूनं राम मंदिरासाठी केलं सर्वाधिक दान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Inauguration | 22 तारखेला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. तसेच रामललाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भव्य राम मंदिर संपूर्णपणे भाविकांच्या देणगीतून बांधले जात आहे. हा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसह 6 हजारहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मागील काही दशकं ज्या वास्तूभोवती देशाचं राजकारण फिरत होतं ती वास्तू आज उभी राहते आहे. यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

इच्छुकांच्या देणगीतून राम मंदिर बांधले जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी 5,500 कोटींहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत आणि योगदानाचा ओघ अजूनही सुरूच आहे. पण, मंदिराला सर्वाधिक देणगी किंवा दान कोणी दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? खरं तर राम मंदिरासाठी सर्वाधिक दान करणारा व्यक्ती कोणी व्यापारी, उद्योगपती किंवा राजकारणी नाही. तर एक आध्यात्मिक गुरू आहेत, ज्यांनी सर्वाधिक दान केलं आहे.

Ram Mandir Inauguration 22 तारखेला भव्य कार्यक्रम

दरम्यान, राम मंदिरासाठी सर्वाधिक दान करणारे दुसरे तिसरे कोणी नसून रामचरितमानस या महाकाव्याचे प्रख्यात व्याख्याते मोरारी बापू (morari bapu) हे आहेत. ते स्वतःला एक नम्र फकीर म्हणून संबोधतात. तसेच त्यांनी त्यांच्या कृत्यातून हे दाखवून दिलं आहे. राम मंदिरासाठी लागणारा खर्च मोठा आहे, त्याच्या बांधकामासाठी सर्वात मोठी देणगी देऊन मोरारी बापू यांनी मोठे औदार्य दाखवले.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मोरारी बापू यांनी मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 11.3 कोटी रुपयांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त यूएस, कॅनडा आणि यूकेमधील त्यांच्या अनुयायांनी एकूण 8 कोटी रुपयांची स्वतंत्र देणगी दिली आहे. मोरारी बापू यांनी मंदिराच्या निर्माणासाठी अनेक लढ्यांमध्ये सहभाग घेतला आहे.

कोण आहेत मोरारी बापू?

1946 मध्ये गुजरातमधील भावनगर येथे जन्मलेले मोरारी बापू आजही आपल्या कुटुंबासह तिथेच वास्तव्यास आहेत. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पैलू म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी तुलसीदासांनी लिहिलेली संपूर्ण रामचरितमानस ही कविता आठवली आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी रामकथेचे पठण सुरू केले.

आध्यात्मिक नेते म्हणून मोरारी बापूंची सर्वत्र ओळख आहे. बापूंचे अनुयायी हे मंदिर प्रकल्पाचे कट्टर समर्थक आहेत. रामचरितमानसमधील मजकूरामुळे बापूंना प्रसिद्धी मिळाली. भारत आणि परदेशात 50 वर्षांहून अधिक काळ रामकथा किंवा महाकाव्य म्हणून वापरली जात आहे. रामचरितमानस देखील रामायणावर आधारित आहे.

Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक

How To Increase Instagram Followers l इंस्टग्रामवर फॉलोवर्स वाढवायचेत? तर या ट्रिक्सचा करा वापर

IPO Investment l शेअर बाजारातील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा फक्त 15 हजार रुपयेचं का असते?

IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण

Self Confidence in Your kid l पालकांनो, लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा