Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mukesh Ambani | रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’ या (vibrant gujarat 2024) कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी देश-विदेशातील अनेक नामांकित उद्योगपतींची उपस्थिती होती. मुकेश अंबानींनी सांगितले की, रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गांधीनगरमध्ये 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (Vibrant Gujarat Global Summit 2024 in Gandhinagar) दरम्यान हे विधान केलं. अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान असल्याचेही नमूद केलं.

Mukesh Ambani अन् गुजरात

मुकेश अंबानी म्हणाले की, 2047 पर्यंत गुजरात 3000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. तसेच 2047 पर्यंत भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार असल्याचे अंबानींनी सांगितलं.

जगभर पसरलेल्या रिलायन्सबद्दल बोलताना मुकेश अंबानी यांनी म्हटले, “रिलायन्स ही एक गुजराती कंपनी होती, आहे आणि भविष्यात देखील कायम राहील. मागील 10 वर्षांत रिलायन्सने भारतभर जागतिक दर्जाची मालमत्ता आणि क्षमता निर्माण करण्यासाठी 150 बिलियन डॉलर म्हणजेच 12 लाख कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे.”

नरेंद्र मोदी भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान – अंबानी

या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत. पुढील 10 वर्षात महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसह रिलायन्स गुजरातच्या विकासकार्यात मोठी भूमिका बजावत राहील. खासकरून ग्रीन ग्रोथच्या वाढीमध्ये गुजरातला जागतिक पातळीवर पुढे नेण्यात रिलायन्स योगदान देईल. आम्ही रिन्यूएबल एनर्जीच्या माध्यमातून 2030 पर्यंत गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्यास शक्य तितकी मदत करू.

तसेच या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुकेश अंबानी यांनी आपल्या योजनांची माहिती दिली. गुजरातमध्ये रिलायन्स उद्योग समूह मोठ्या प्रमाणात सक्रिय असून आम्ही जामनगरमध्ये 5,000 एकरच्या धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्समुळे मोठ्या प्रमाणात क्रांती घडेल आणि नोकऱ्या निर्माण होतील. याशिवाय सामग्रीचे उत्पादन आणि उत्पादन सक्षम होईल. 10 हजार रुपयांचे उत्पादन करणे शक्य होईल. गुजरात हरित उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार बनणार आहे. आम्ही 2024 च्या उत्तरार्धातच ते सुरू करण्यास तयार आहोत, असेही त्यांनी सांगितलं.

How To Increase Instagram Followers l इंस्टग्रामवर फॉलोवर्स वाढवायचेत? तर या ट्रिक्सचा करा वापर

IPO Investment l शेअर बाजारातील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा फक्त 15 हजार रुपयेचं का असते?

IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण

Self Confidence in Your kid l पालकांनो, लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा

Maharashtra Politics | निकाल लागला! जुना फोटो शेअर करत सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग, कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन