Ram Mandir Inauguration | राजकारण तापलं! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणावर काँग्रेस नेत्यांचं मोठं विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Inauguration | 22 तारखेला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजप राम मंदिराच्या कार्यक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राम मंदिर ट्रस्टच्या वतीन देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेस नेत्यांना देखील निमंत्रण दिले असता राजकारण सुरू झाल्याचे दिसते. कारण विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने राम मंदिराला राजकीय मुद्दा बनवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

खरं तर काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे. काँग्रेस पक्षाने याला आरएसएस-भाजपचा कार्यक्रम म्हटले आहे. अधुऱ्या आणि अपूर्ण राम मंदिराच्या अभिषेक समारंभाला जाणार नाहीत, असे काँग्रेस पक्षाने म्हटले. कांग्रेसने निमंत्रणाला नकार देताच भाजपने टीकास्त्र सोडले. भाजपने राम मंदिराला राजकीय मुद्दा बनवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Ram Mandir Inauguration अन् राजकारण

धर्म ही वैयक्तिक बाब असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले आहे. यावरून देशात वेगळेच राजकारण सुरू झाले असून काँग्रेसने भाजप या प्रकरणाला हवा देत असल्याचे म्हटले. अशा परिस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणावर काँग्रेस नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

कांग्रेसच्या हायकमांडने भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की, भगवान राम आपल्या सर्वांचे आहेत. राजकारणात धर्माचा वापर करू नये. तर, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून राम मंदिरावर राजकारण केले जात असल्याचे म्हटले.

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. भाजप आणि आरएसएसचे नेते निवडणुकीच्या फायद्यासाठी अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन करत आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला असला तरी उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते 15 जानेवारीला अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहेत.

राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले. पक्षाचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश यांनी एक पत्रक काढत ही माहिती दिली. मागील महिन्यातच सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. पण, भाजप याला राजकीय इव्हेंट करत असल्याने 22 तारखेच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Inauguration | राजकारणी किंवा उद्योगपती नाही! ‘या’ आध्यात्मिक गुरूनं राम मंदिरासाठी केलं सर्वाधिक दान

Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक

How To Increase Instagram Followers l इंस्टग्रामवर फॉलोवर्स वाढवायचेत? तर या ट्रिक्सचा करा वापर

IPO Investment l शेअर बाजारातील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा फक्त 15 हजार रुपयेचं का असते?

IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण