Induction Cooking Tips l आजकाल गृहिणी स्वयंपाक घरात काहीतरी पटकन शिजवण्यासाठी इंडक्शन वापरतात. इंडक्शनचा वापर केल्याने गॅसची बचत होते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? इंडक्शन वापरताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. इंडक्शनवर स्वयंपाक करताना (Induction Cooking Tips) काही खबरदारी न घेतल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर आज आपण इंडक्शन वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात…
ही भांडी वापरू नका :
जर तुम्ही इंडक्शन वापरत असाल तर जर्मन धातूंची भांडी वापरू नका. इंडक्शनवर अन्न शिजवण्यासाठी तुम्ही चुंबकीय कुकवेअर म्हणजे विशेष प्रकारची भांडी वापरावी लागतात. महत्वाची बाब म्हणजे तांबे, अॅल्युमिनियम, काच किंवा सिरॅमिकची बनलेली भांडी त्यांच्या खाली चुंबकाचा थर जोडल्याशिवाय इंडक्शनवर काम करत नाहीत. त्यामुळे चुंबकाचा थर असलेली भांडी वापरा. तसेच इंडक्शनवर स्वयंपाक करण्यासाठी कास्ट आयर्न भांडी वापरण्याचा सल्ला दिला जातो.
Induction Cooking Tips l अन्न पूर्णपणे शिजले जाणार नाही :
जर तुम्ही इंडक्शन बनवलेली (Induction Cooking Tips) भांडी वापरत नसाल आणि त्याऐवजी लहान दुसरे भांडे वापरत असाल तर इंडक्शन लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच अन्नही खराब होऊ शकते. याशिवाय इंडक्शन कुकवाय भांडी न वापरता दुसरी भांडी वापर तर अन्न नीट शिजत नाही आणि ते आरोग्यासाठी देखील चांगले नसते.
हे उत्पादन इंडक्शनपासून दूर ठेवा :
स्वयंपाक करण्यापूर्वी हे जाणून घ्या की, इंडक्शनवर (Induction Cooking Tips) कोणतेही प्लास्टिक किंवा कागदाच्या वस्तू वापरू नका. कूकटॉप खूप गरम झाल्यामुळे अशा उत्पादनांना आग लागू शकते आणि इंडक्शनचे नुकसान देखील होऊ शकते. याशिवाय प्लास्टिकचा वापर केल्यास आरोग्यासाठी प्लास्टिक घातक ठरतात.
Induction Cooking Tips l इंडक्शन कसे स्वच्छ करावे :
इंडक्शनचा साफ करण्यासाठी मऊ कापड किंवा स्पंज वापरा. इतर कोणत्याही वस्तू वापरू नका.इतर लिक्विड वापरल्याने इंडक्शन खराब होण्याची शक्यता असते.
महत्वाच्या घडामोडी :
Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक
How To Increase Instagram Followers l इंस्टग्रामवर फॉलोवर्स वाढवायचेत? तर या ट्रिक्सचा करा वापर