Hero Mavrick 440 l Royal Enfield सोबत स्पर्धा करण्यासाठी Hero Mavrick 440 बाईक या तारखेला होणार लाँच!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hero Mavrick 440 l Ro MotoCorp 2024 मध्ये ग्राहकांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. कंपनी 22 जानेवारीला आपल्या नवीन मोटरसायकलचे अनावरण करणार आहे, ज्याचे नाव Maverick 440 असेल. ही बाईक हीरोची सर्वात शक्तिशाली मोटरसायकल असेल असे म्हटले जात आहे. तसेच मोटारसायकल Harley Davidson X440 वर आधारित असू शकते. तर आज जाणून घेऊयात या नवीन बाईक्सबद्दल…

Royal Enfield Classic 350 शी स्पर्धा करेल :

Hero Maverick 440 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 2 लाख असू शकते. तसेच ही बाईक 300 सीसी पेक्षा जास्त शक्तिशाली मोटरसायकल विभागात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या रॉयल एनफिल्ड तसेच Honda CB350 सारख्या बाइक्सना कठीण स्पर्धा देण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारपेठेत पॉवरफुल बाईकची मागणी वाढत असताना रॉयल एनफिल्ड तसेच होंडा, जावा, येझदी या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी हिरो आपली मॅवेरिक कोणत्या खास वैशिष्ट्यांसह सादर करू शकते याची ग्राहकांना उत्सुकता लागली आहे.

Maverick 440 मध्ये असणार शक्तिशाली इंजिन :

Hero Maverick 440 मध्ये 440cc BS6 2.0 इंजिन असू शकते, जे 27.37 PS पर्यंत कमाल पॉवर आणि 38 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिसू शकतो. यानंतर त्याच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक शोषक, मागील बाजूस एबीएस यासह इतर बाह्य वैशिष्ट्ये असू शकतात.

Hero Mavrick 440 l राउंड हेडलॅम्प :

Hero Mavrick 440 या बाईक्सचा लूक आणि डिझाईन आकर्षक असणार आहे. Hero Maverick 440 मध्ये गोल हेडलॅम्प, रुंद हँडलबार, मोठी इंधन टाकी, अलॉय व्हील्स आणि सिंगल पॉड TFT कन्सोल असणार आहे. यामध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील असू शकते. तसेच ट्रिपर नेव्हिगेशनसह बरीच माहिती असू शकते.

निओ-रेट्रो क्रूझर शैली!

Hero Maverick 440 चा लुक आणि डिझाईन हार्ले डेविडसन पेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. यामध्ये सर्व एलईडी लाईट्ससोबतच हिरोचे सिग्नेचर एच आकाराचे डीआरएल, आकर्षक डिझाईन देखील पाहता येईल. Hero MotoCorp आपली सर्वात शक्तिशाली मोटरसायकल Maverick 440 निओ-रेट्रो क्रूझर शैलीसह सादर करू शकते.

महत्वाच्या घडामोडी :

Induction Cooking Tips l स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शनचा वापर करताय? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठे नुकसान

IND vs AFG | पार्टी केल्यानं किशनची संघातून हकालपट्टी? भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

Ram Mandir Inauguration | राजकारण तापलं! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणावर काँग्रेस नेत्यांचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | राजकारणी किंवा उद्योगपती नाही! ‘या’ आध्यात्मिक गुरूनं राम मंदिरासाठी केलं सर्वाधिक दान

Mukesh Ambani | “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील”, अंबानींकडून मोदींचंही कौतुक