Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Sharad Mohol | कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पुण्यात भर दिवसा घडलेल्या गोळीबारामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शरद मोहोळवर काही दिवसांपूर्वी त्याच्या ऑफिसजवळ तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. मुख्य  अरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून शरदच्या जिवाभावाचा मित्र होता. दरम्यान शरदच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

शरदची हत्या झाली तेव्हा तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा तो फसला. अखेर मोहळ याच्या लग्नाच्या वाढदिवशीच, आरोपींनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असून या गुन्ह्यातील मास्टर माईंड कोण आहे याचा शोधही पोलिस घेत आहेत.

जवळच्या मित्राने केला Sharad Mohol चा घात

शरद मोहोळ (Sharad Mohol) याला मारण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीनेच कट रचला होता. शिवाय मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर यांनीच शरदवर मागून गोळ्या झाडल्या. दरम्यान, शरदला मारण्यासाठी कट रचत असताना 15 डिसेंबरलाच सर्व आरोपी भेटले होते.

मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळचा सच्चा दोस्त होता. शरद मोहोळचा पाठीराखा बनून मोहोळच्याच पाठीत त्याने खंजीर खुपसला. मुन्नाचं वय 20 वर्ष आहे. मात्र, असं काय घडलं ज्यामुळे मुन्नाने शरदची हत्या केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार असल्याचं समोर आलंय. मात्र आता याप्रकरणी नवा अँगल समोर आला आहे. या हत्येमागं दुसरंच कारण असल्याचं कळतंय. शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. एकमेकांसमोर बसवून आरोपींची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केलीये. कारण काही महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.

महत्त्वाच्या बतम्या- 

Ujjwal Nikam | कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांचा ठाकरे गटाला महत्त्वाचा सल्ला!

Hero Mavrick 440 l Royal Enfield सोबत स्पर्धा करण्यासाठी Hero Mavrick 440 बाईक या तारखेला होणार लाँच!

Induction Cooking Tips l स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शनचा वापर करताय? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठे नुकसान

IND vs AFG | पार्टी केल्यानं किशनची संघातून हकालपट्टी? भारतीय प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

Ram Mandir Inauguration | राजकारण तापलं! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणावर काँग्रेस नेत्यांचं मोठं विधान