Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar Talathi Bharti l सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच पहिल्या दिवसापासून वादात सापडलेल्या तलाठी भरतीने (Talathi Bharati 2023) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील आठवड्यात तलाठी भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी (Rohit Pawar Vs Radhakrushna Vikhe Patil) :

आता तलाठी भरतीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचा संशय व्यक्त केला आहे. (Talathi Bharati 2023)

तसेच रोहित पवार यांनी एका जागेसाठी 25 लाख रुपयांची वसूली झाली असल्याचे धक्कादायक आरोप देखील केले होते. आता याप्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे.

Rohit Pawar Talathi Bharti l रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार; राधाकृष्ण विखे पाटील

आमदार रोहित पवार यांच्या आरोपांवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक भूमिका घेणार आहेत. तसेच रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणले आहे. तसेच रोहित पवार (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केलेले सर्व आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.

तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याबाबत बोलताना असे म्हणाले आहेत की, सत्ताधारी सरकार विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तलाठी भरतीवरून खोटे आरोप करत आहे.

तसेच खोटे प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार (Rohit Pawar) असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. याशिवाय जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा? असा सवाल उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवारांनी विखे पाटलांच्या महाविद्यालयावर केला प्रश्न उपस्थित :

या सर्व प्रकरणावरून आमदार रोहित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महाविद्यालयांवर प्रश्न उपस्थित केला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का? तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला डॉक्टर करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी :

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Oppo Find X7 Ultra l जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असलेला OPPO Find X7 सीरीज लाँच; जाणून घ्या किंमत

Ujjwal Nikam | कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांचा ठाकरे गटाला महत्त्वाचा सल्ला!

Hero Mavrick 440 l Royal Enfield सोबत स्पर्धा करण्यासाठी Hero Mavrick 440 बाईक या तारखेला होणार लाँच!

Induction Cooking Tips l स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शनचा वापर करताय? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठे नुकसान