Mukesh Ambani | “…तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mukesh Ambani | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Rich) आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती (Bussiness) यांनी गुजरातला मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं आहे. रिलायन्स (Reliance) ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असं मोठं वक्तव्य मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

अंबानींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक

मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुकेश अंबानींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तसेच तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय.

रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटतं होतं. पण अंबानी यांनी कालच स्पष्ट सांगून टाकलं की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करता आहात ना?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.

मराठी माणसाची जमिन गुजराती लोक व्यवसायासाठी खरेदी करतात. मराठी माणसाची जमिन जाते. फायदा मात्र, गुजरात्यांचा होतो. शिवाय, गुजराती माणसांकडून मराठी माणसांना रोजगारही मिळत नाही, असंही संदीप देशपांडे यांनी नमूद केलंय.

Mukesh Ambani नेमकं काय म्हणाले?

गेल्या 10 वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, यापैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलंय.

गुजरातमधील रिलायन्सची गुंतवणूक पुढील 10 वर्षे सुरू राहील आणि 2030 पर्यंत गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा त्यांची कंपनी तयार करेल, ही मोठी घोषणा अंबानी यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Oppo Find X7 Ultra l जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असलेला OPPO Find X7 सीरीज लाँच; जाणून घ्या किंमत