‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

Aamir Khan | आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आणि नूपुर शिखरे यांचा उदयपुरमध्ये मोठ्या उत्साहात विवाहसोहळा पार पडला. आयरा आणि नूपुर यांनी अगोदर नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. नंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केलं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान आमिर खान (Aamir Khan) भावूक झाल्याचं दिसून आलं.

आयराला नूपुरने आंगठी घालताच आमिरच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. यावेळी त्याची पहिली पत्नी रीना दत्ता (Reena Dutta) देखील भावूक झाल्याचं दिसलं. व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर खान रुमालाने आपले डोळे पुसताना दिसला. आमिर (Aamir Khan) यात काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला.

लेकीला पाहून आमिरच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आमिरची (Aamir Khan) लेक आयराने यावेळी पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. त्यावर तिने फुलांची मस्त हेअर स्टाइल केली होती. तर, नुपुर टक्सिडो सूटमध्ये उठून दिसत होता.नोंदणी विवाहात नूपुरने बनीयान घातल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे लग्नातही तो काहीतरी अजब घालणार काय, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र नूपुरचा टक्सिडो सूटमधील लुक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

आयरा आणि नूपुर यांनी ‘तुम मिले तो जादू छा गया’ या गाण्यावर डान्सही केला. दोघेही यात खूपच सुंदर दिसत आहेत. आयराच्या विवाहासाठी ताज आरवली हॉटेलमध्ये साजेशी सजावट करण्यात आली होती. विवाहपूर्वी झालेल्या संगित सेरेमनी मध्ये आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव हीने गाणंही गायलं होतं. तसेच, आमिरनेही ((Aamir Khan) ) लेकीसाठी ‘बाबूल की दुवाए लेती जा..’, हे गाणं गायलं होतं. साधारण आठवडा भर चाललेल्या या विवाह सोहळ्याची सगळीकडेच चर्चा झाली.

आमिर खान आणि किरण राव यांची केमिस्ट्री या दरम्यान दिसून आली. अगदी ड्रेसिंग पासून ते विवाहपर्यंत आयराच्या लग्नातील प्रत्येक गोष्टी खास होत्या. किरण रावने घातलेली नऊवारी साडी आणि त्यावर लावलेला गजरा तसेच आयराने नोंदणी विवाहात घातलेली कोल्हापुरी चप्पल या सर्व गोष्टी या दिवसात चर्चेत होत्या. अखेर आज या जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला.

‘या’ ठिकाणी असणार शानदार रिसेप्शन |

उदयपूरमध्ये पार पडलेल्या या शाही विवाह नंतर आमीरने (Aamir Khan) मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. या रिसेप्शनचे अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, करण जोहर, अक्षय कुमार, करीना कपूर, राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर यांसह अनेक कलाकारांची रिसेप्शनमध्ये उपस्थिती असणार आहे.

News Title- Aamir Khan emotional moment

महत्त्वाच्या बतम्या- 

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव

Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्याबाबत नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा!

Dhananjay munde | महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ  

Mukesh Ambani | “…तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा”