Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्याबाबत नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Neetu Kapoor | अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी (Rishi Kapoor) यांची जोडी बॉलिवूडमधील फेमस जोडीपैकी एक होती. ऋषी कपूर आणि त्यांच्या नात्याबद्दल नीतू कपूर यांनी ‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर अनेक खुलासे केले. यावेळी त्या ऋषी कपूर यांच्या आठवणीत रमताना दिसल्या. शेवटचे दिवस आठवत त्या भावुकही झाल्या.

ऋषी कपूर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचे नाते कसे होते, याबाबत नीतू कपूर यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. आम्ही एकत्र घालवलेला वेळ आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ होता. आम्ही खूप मस्ती करायचो. खरंच ते दिवस खूप भारी होते, असा खुलासा नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी केला.

नीतू कपूर यांचा खुलासा

लग्नापूर्वीचा किस्सा सांगत नीतू कपूर (Neetu Kapoor) म्हणाल्या की, “एक बॉयफ्रेंड म्हणून ऋषी कपूर वागण्याच्या बाबतीत खूपच कठोर होता. त्याला माझं पार्टी करणं बिलकुल आवडत नव्हते. त्यामुळे त्याने माझं पार्टी करणंच थांबवलं होतं. मी काय करायला हवं, काय नाही या प्रत्येक गोष्टीत तो पडायचा. त्यामुळे मला कधीही मोठ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होता आलं नाही.”

माझ्या आयुष्यात माझी आईसुद्धा वागण्याच्या बाबतीत खूपच कठोर होती. त्यात ऋषी कपूरदेखील तसाच होता. त्यामुळे मी आयुष्यात दोन कठोर व्यक्ती बघितल्या आहेत, असा खुलासा नीतू कपूर यांनी केला. ऋषी आणि मी सोबत खूप वेळ घालवला आहे. खासकरून यश चोप्रा यांच्यासोबत आम्ही दररोज पार्टी करायचो, अंताक्षरीदेखील खेळायचो, असंही नीतू कपूर म्हणाल्या.

न्यूयॉर्कमधील दिवस आठवणीचे…

नीतू कपूरने (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये सर्वांत आनंदी दिवस व्यतीत केले. मला आमच्या नात्यातील चांगले दिवस आठवायला आवडते.मला तो दुःखाचा दिवस आठवू वाटत नाही. आम्ही न्यूयॉर्कमध्ये एकत्र खूप वेळ राहिलो. याचदरम्यान ऋषी कपूर यांना बऱ्याच गोष्टींची जाणीवही झाली असल्याचं नीतू कपूर यांनी सांगितलं.

ऋषी कपूर यांनी आपली मुले रणबीर कपूर आणि रिद्धिमा यांच्याबद्दलच्या भावना कधीच उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र, न्यूयॉर्कमध्ये त्याच्यात अनेक बदल झाले. या काळातच त्यांनी आपल्या जवळच्या लोकांबद्दल प्रेम आणि आपुलकी दाखवली, असंही नीतू कपूर म्हणाल्या. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची पहिली भेट ‘जहरीला इंसान’च्या शूटिंगदरम्यान झाली होती. तेव्हा नीतू कपूर अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी कायम एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

News Title- Neetu Kapoor Big revelation

महत्त्वाच्या बतम्या- 

Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Oppo Find X7 Ultra l जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असलेला OPPO Find X7 सीरीज लाँच; जाणून घ्या किंमत