Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात चीतपट करून यजमान भारतीय संघानं विजयी सलामी दिली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला गुरूवारपासून सुरूवात झाली. पहिला सामना मोहालीत खेळवला गेला. कडाक्याच्या थंडीत चाहत्यांसह खेळाडू देखील गारठल्याचे दिसले. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी साजेशी कामगिरी करून अफगाणिस्ताना 158 धावांवर रोखले. पण, कर्णधार म्हणून मोठ्या कालावधीनंतर ट्वेंटी-20 संघात परतलेल्या रोहितला पंचांनी एक इशारा दिला. हिटमॅनला आपली एक चांगलीच भोवली असती. (rohit sharma warning by umpire).

अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या होत्या. मोहम्मद नबीच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पाहुण्यांनी 150 धावांचा टप्पा ओलांडला. नबीने 27 चेंडूत 42 धावांची अप्रतिम खेळी केली. भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर शिवम दुबेला एक बळी मिळाला.

Rohit Sharma वाचला नाहीतर…

दरम्यान, भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना पंचांनी रोहित शर्माला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असल्याचं दाखवून दिलं. रोहितला ही चूक चांगलीच महागात पडली असती. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) नवा नियम खेळाडूंना वेळेचं महत्त्व सांगणारा आहे. खरं तर झालं असं की, सोळावं षटक सोपवताना आणि गोलंदाजाची निवड करताना रोहितला वेळ लागला. याचाच दाखला देत पंचांनी भारतीय कर्णधाराला इशारा दिला.

रोहितला पहिलीच वॉर्निंग दिली असल्यानं भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला. आयसीसीच्या नियमानुसार तीन चुका केल्यास संबंधित संघाचा कर्णधार कारवाईस पात्र ठरतो. अर्थात भारतीय संघाला फटका बसला असता. पंचांनी दिलेला इशारा आणि रोहित शर्मा वेळीच झालेला सावध… त्यामुळे ती चूक पुन्हा झाली नाही अन् भारताने वेळेत 20 षटकं पूर्ण केली. भारताच्या 15 व्या षटकात रवी बिश्नोईची चांगलीच धुलाई झाली. मोहम्मद नबीने स्फोटक खेळी केल्यानंतर रोहित शर्मावर दबाव आला.

ICC च्या कचाट्यातून वाचला

पंधराव्या षटकात 16 धावा गेल्यानंतर सोळावं षटक कोणाला द्यायचं हा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे रोहितला लवकर निर्णय घेता आला नाही. यासाठी भारतीय कर्णधारानं 60 सेकंदांहून अधिक वेळ घेतल्याचं पंचांच्या लक्षात आलं. इतक्यात 64  व्या सेकंदाला रोहितनं मुकेश कुमारला सोळावं षटक टाकण्यास सांगितलं. पण 4 सेकंद उशीर झाला असल्याचं लक्षात येतात पंचांनी हिटमॅनकडे धाव घेत इशारा दिला.

एखादं षटक संपल्यानंतर पुढील षटक सोपवण्यासाठी आयसीसीच्या नव्या नियमानुसार कर्णधाराकडे 60 सेकंदांचा वेळ असतो. पण, जर याबाबत कर्णधाराकडून वेळेचं बंधन पाळलं गेलं नाही तर दंड आकारला जातो. तीन वेळा अशी चूक झाल्यास आयसीसी संबंधित कर्णधारावर कारवाई करते. 5 धावांचा दंड ठोठावला जातो. त्यामुळे पुढचा गोलंदाज कोण असेल याबाबत कर्णधाराला आधीच ठरवावं लागतं.

भारताची विजयी सलामी

अफगाणिस्ताननं दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 17.3 षटकांत 4 गडी गमावून 159 धावा करून विजय साकारला. यजमान संघाकडून शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. त्याने 40 चेंडूत 60 धावांची अप्रतिम खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव

Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्याबाबत नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा!

Dhananjay munde | महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ