School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

School | सरकारी शाळेत प्रार्थनेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध पडला अन् काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. बिहारमधील मोतिहारी येथीय या धक्कादायक घटनेनं सर्वांनाच धक्का बसला. खरं तर येथील एका शाळेत विद्यार्थी बेशुद्ध पडला असता त्याला तातडीने शिक्षकांनी उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, तोपर्यंत कोणाच्याच हातात काही राहिले नव्हते. कारण रूग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

मुझफ्फरपूर शहरातील आदर्श सरकारी माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली. नेहमीप्रमाणे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सकाळी प्रार्थना करत होते. तितक्यात 12 वर्षीय मनीष कुमार हा विद्यार्थी बेशुद्ध होऊन पडला. इयत्ता सहावीत शिकत असलेला मनीष हा जवळील बैसाहा गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील राजेश यांना घटनेची माहिती मिळताच एकच धक्का बसला.

School मध्येच मृत्यू…

दरम्यान, या प्रकरणाची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर शिक्षकांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी शाळेवर निष्काळजीपणाचा आरोप केला. ते म्हणाले की, शाळेने ड्रेसव्यतिरिक्त जॅकेट किंवा इतर कपडे घालण्यास मनाई केली आहे.

त्यामुळे त्यांच्या मुलाला जास्त थंडी सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत मुलाच्या कुटुबीयांच्या आरोपांवर शाळेचे मुख्याध्यापक रामनारायण पासवान यांनी सांगितले की, सर्व मुले आम्हाला प्रिय आहेत. कुटुंबीयांचे आरोप निराधार आहेत. अहवाल आल्यानंतरच मुलाच्या मृत्यूचे कारण समजेल.

थंडीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता

आमच्याकडून आम्ही शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुटुंबीयांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. शिक्षकांनी आणखी सांगितले की, कुटुंबीयांनी केलेले आरोप यात काहीच तथ्य नाही. त्याच्या घरच्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नसण्याचीही शक्यता आहे.

असे देखील होऊ शकते की मुलाकडे उबदार कपडे नसावेत. पोलीस या प्रकरणी अधिक माहिती देतील. डॉक्टरांचा अहवाल आल्यावर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक चकिया पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. बिहारमध्ये दरवर्षी महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक थंडी असते.

 महत्त्वाच्या बातम्या –