Rakhi Sawant चा जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; समोर आलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rakhi Sawant | ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती तिच्या नाट्यमय घडामोडींमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. राखी सावंतचा एक्स अर्थात आदिल खान दुर्रानीमुळे राखीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदिलने राखीवर गुन्हा दाखल केला होता. त्याने सांगितले की, तिने काही खासगी गोष्टी प्रसारित केल्या आहेत. तसेच राखीने त्याचे काही प्रायव्हेट व्हिडीओ माध्यमांमध्ये लीक केले होते.

याप्रकरणी अटक होऊ नये यासाठी राखीने मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण तो न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने अटकेचे अंतरिम संरक्षण वाढवले ​​आहे. त्यामुळे राखीला तूर्त काही दिलासा मिळाला. पण तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. काही सत्रांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

Rakhi Sawant चा जामीन फेटाळला

राखीचा जामीन अर्ज फेटाळताना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत भोसले म्हणाले की, राखीने जे काही केले ते चुकीचे होते. तिने ज्या प्रकारे तिच्या माजी पतीचे व्हिडीओ प्रसारित केले ते चुकीचे आहे. राखीविरुद्ध यापूर्वीही असाच एक खटला प्रलंबित आहे. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणात कोणालाही सूट देणे योग्य ठरणार नाही.

राखी सावंतने ज्या प्रकारे माझे सेक्शुअल व्हिडीओ माध्यमांमध्ये प्रसारित केले ते वाईट कृत्य असल्याचे आदिलने म्हटले. याप्रकरणी आदिलने राखीविरोधात एफआयआर दाखल केला होता. कलम 500 (मानहानी), 34 (सामान्य हेतू) आणि कलम 67A (इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.

राखीवर अटकेची टांगती तलवार

आदिलने केलेले गंभीर आरोप पाहता न्यायालयानेही त्याच्या बाजूने निकाल दिल्याचे दिसते. त्यामुळे राखीची अडचण वाढली. कारवाई टाळण्यासाठी राखीने देखील तिच्या परीने सर्व प्रयत्न केले होते. तिने याप्रकरणी तिला अटक होऊ नये, असा अर्ज मुंबई न्यायालयात दाखल केला होता.

दरम्यान, राखी सावंतने या प्रकरणी पोलिसांना प्रत्येक प्रकारे साथ दिली आहे. मात्र, राखीने ज्या उपकरणांद्वारे बाबी प्रसारित केल्या आहेत, ती उपकरणे जप्त करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही, असे न्यायाधीश भोसले यांनी सांगितले. व्हिडीओ क्लिप्स व्हायरल करण्यात आलेली साधने अजूनही राखीकडे आहेत. तिने काहीही सादर केलेले नाही.

 महत्त्वाच्या बातम्या –

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव