UGC NET Result Date l अखेर UGC NET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लागणार निकाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

UGC NET Result Date l UGC NET परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता UGC NET परीक्षेचा निकाल लवकरच उमेदवारांच्या हाती येणार आहे. 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 292 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET Result Date) घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एनटीएने निकालाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे.

UGC NET निकालाची तारीख जाहीर :

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, UGC NET परीक्षेचा निकाल 17 जानेवारी 2024 रोजी NTA च्या अधिकृत वेबसाइटवर घोषित केला जाणार आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील नैसर्गिक आपत्तीमुळे (मिचॉन्ग चक्रीवादळ) चेन्नई आणि आंध्र प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. त्यामुळे नियोजित तारखेला निकाल जाहीर होणार नसून आता 17 जानेवारी 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे.

UGC NET Result Date l अशाप्रकारे पाहता येणार UGC NET परीक्षेचा निकाल :

– UGC NET निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
– निकाल जाहीर होताच वेबसाइटच्या होम पेजवर (UGC NET Result Date) निकालाची लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.
– पुढे तुम्ही नवीन पेजवर अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन यासारखी लॉगिन माहिती भरून सबमिट करावे.
– तुम्ही माहिती सबमिट करताच निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊ शकता.

9 लाखांहून अधिक उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत! :

राष्ट्रीय पात्रता परीक्षेशी (UGC NET Result Date) संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय उमेदवार हेल्प डेस्क क्रमांक 011-40759000/011- 69227700 वर संपर्क साधू शकतात.

 महत्त्वाच्या बातम्या –

Rakhi Sawant चा जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; समोर आलं मोठं कारण

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल