Rohit Sharma सोबत झाला मोठा धोका, मग शुभमन गिलने सर्वांसमोर खाल्ली शिवी!, पाहा Video

Rohit Sharma । भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. मोहाली येथे झालेल्या सामन्यात खेळाडू गारठल्याचे दिसले. कडाक्याच्या थंडीत खेळाडूंनी जॅकेट परिधान करून सामना खेळला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग भारताने 17.3 षटकांत पूर्ण करून विजयी सलामी दिली.

अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. पण, रोहित धावबाद झाला अन् एकच खळबळ माजली. गिलला या सामन्यात काही खास करता आले नाही. शिवाय त्याला आपल्या कर्णधाराच्या रोषाला सामोरे जावे लागले. रोहित धावबाद होताच त्याने संताप व्यक्त केला.

Rohit Sharma ला राग अनावर

रोहित शर्माने 14 महिन्यांनंतर भारताच्या ट्वेंटी-20 संघात पुनरागमन केले आहे. पण हिटमॅनचे पुनरागमन एका वाईट स्वप्नाप्रमाणे झाले. मोहालीत अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला गिलच्या एका चुकीचा मोठा फटका बसला. शुभमनची चूक अन् रोहित संतापल्याचे दिसले. कारण रोहितने सर्वांसमोर या युवा फलंदाजाला उघडपणे शिवीगाळ केली.

 

मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाची सलामी जोडी म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळपट्टीवर आले. या सामन्यात यशस्वी जैस्वाल सलामीवीर असणार होता, ज्याची घोषणा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक दिवस आधी केली होती. परंतु मांडीच्या दुखापतीमुळे तो हा सामना खेळू शकला नाही आणि गिलला सलामीची संधी मिळाली.

दरम्यान, भारताच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर गिलने अशी चूक केली की रोहित कायम लक्षात ठेवेल. खरं तर झाले असे की, डावाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने पुढे जाऊन मिडऑफच्या दिशेने एक शॉट खेळला आणि धाव घेतली. पण, मिडऑफ क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवला आणि यष्टीरक्षकाकडे सोपवला. रोहित धाव घेण्यासाठी धावला पण गिल चेंडूकडेच पाहत राहिला आणि 2 पावले पुढे जाऊन पुन्हा खेळपट्टीकडे परतला. तोपर्यंत रोहित दुसऱ्या एंडला आला होता अन् अफगाणिस्तानला भारतीय कर्णधाराचा बळी मिळाला.

शिवम दुबेची अप्रतिम खेळी

कर्णधार रोहित स्वस्तात बाद झाला पण भारतीय संघाने फलंदाजीतही चमक दाखवली. 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. त्याने 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 40 चेंडूत 60 धावांची खेळी केली. भारताने 17.3 षटकांत 4 बाद 159 धावा करून विजय साकारला.

महत्त्वाच्या बातम्या –

Rakhi Sawant चा जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; समोर आलं मोठं कारण

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल