IND vs AFG | LIVE सामन्यात मोठा राडा, सामन्यानंतर मात्र रोहितच्या त्या वाक्यानं जिंकली साऱ्यांची मनं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AFG | सर्वांचा लाडका हिटमॅन तब्बल 14 महिन्यांनंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये परतला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेंटी-20 विश्वचषक 2022 नंतर एकही ट्वेंटी-20 सामना खेळला नव्हता. मात्र, सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून दोन्हीही दिग्गजांचे पुनरागमन झाले आहे. सलामीच्या सामन्याला विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मुकला. पण, भारतीय कर्णधार रोहित शर्माने ट्वेंटी-20 मध्ये श्रीगणेशा केला. मात्र, रोहितचे पुनरागमन म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच ठरले. शुभमन गिल आणि रोहितची सलामी जोडी भारतासाठी काही खास करू शकली नाही.

गुरूवारपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 158 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग भारताने सहज केला. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला रोहित शर्माच्या रूपात सुरूवातीलाच मोठा धक्का बसला.

IND vs AFG भारताची विजयी सलामी

रोहित आणि गिल यांची सलामी जोडी फार काळ खेळपट्टीवर टिकली नाही. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर दोघांमध्ये नसलेला ताळमेळ चव्हाट्यावर आला अन् भारतीय कर्णधाराला तंबूत परतावे लागले. खरं तर झाले असे की, रोहितने मिडऑफच्या दिशेने फटका मारला अन् एक धाव घेण्यासाठी कूच केली. मात्र, गिल चेंडूकडेच बघत राहिल्याने अफगाणिस्तानला रोहितला बाद करण्यात यश आले. रोहित बाद होताच भारतीय कर्णधाराचा राग अनावर झाला आणि गिलला शिवी खावी लागली.

सामन्यानंतर बोलताना मात्र रोहित शर्माने सावध प्रतिक्रिया देत म्हटले, “क्रिकेटमध्ये धावबाद होणं अशा गोष्टी घडतच असतात… प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा कराव्या. म्हणूनच हा प्रयत्न केला जातो. अनेकदा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. पण सामना जिंकणं ही सर्वात महत्त्वाची बाब असते. गिलने साजेशी कामगिरी केली. पण, जे काही झालं तो एक खेळाचाच भाग आहे. त्यामुळे मला वाटते त्यात काही गैर नाही किंवा कसली अडचण नाही.”

गिलच्या चुकीमुळे रोहित बाद झाला होता. त्यामुळे भारतीय कर्णधार युवा खेळाडूवर चांगलाच संतापला. रोहितचा राग पाहून गिलला देखील त्याची चूक कळली. रोहितने केलेले हातवारे आणि त्याचा रोष सर्वकाही सांगत होता. लाईव्ह सामन्यात गिलवर नाराजी व्यक्त करत रोहित तंबूत परतला. पण, रोहित बाद होताच गिलने सावध खेळी करून डाव सांभाळला पण तो 12 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

भारताचा मोठा विजय

रोहित शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. पण शिवम दुबेने सर्वाधिक (60) धावा करून सामना एकतर्फी केला. पाहुण्या अफगाणिस्ताननं दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 17.3 षटकांत 4 गडी गमावून 159 धावा करून विजय मिळवला. दुबेने अर्धशतकी खेळी केली. त्याने 40 चेंडूत 60 धावांची अप्रतिम खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

 महत्त्वाच्या बातम्या –

Rohit Sharma सोबत झाला मोठा धोका, मग शुभमन गिलने सर्वांसमोर खाल्ली शिवी!, पाहा Video

UGC NET Result Date l अखेर UGC NET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लागणार निकाल

Rakhi Sawant चा जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; समोर आलं मोठं कारण

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…