Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Don 3 | अभिनेता फरहान अख्तर याने 2006 साली 70 च्या दशकातील अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाचा सिक्वल बनवला होता. शाहरुख खान याने ‘डॉन 2’ मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. आता लवकरच याचा तिसरा सिक्वल (Don 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यात शाहरुख ऐवजी तिसऱ्याच अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

‘डॉन 3’ मध्ये अभिनेता रणवीर सिंहला कास्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे शाहरुखऐवजी रणवीर सिंह आता डॉनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासंबंधीच एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, इमारान हाश्मी (Emraan Hashmi) हा देखील ‘डॉन 3’ (Don 3 ) मध्ये विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे.

इमरान आणि रणवीर दिसणार Don 3 मध्ये?

तब्बल 13 वर्षांनंतर फरहान अख्तर डॉनचा सिक्वेल (Don 3) घेऊन येत आहे. त्यामुळे बॉलीवुड चाहत्यांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे चित्रपटात इमारान हाश्मी आणि शाहरुख खान यांच्यात टक्कर दिसून येण्याची शक्यता आहे. याबाबत निर्मात्यांकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती करण्यात आली नाहीये.

इमारान हाश्मी फरहानच्या ऑफिसमधून निघताना दिसून आला. याचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. त्यामुळे इमारानही डॉन चित्रपटाचा हिस्सा असल्याची चर्चा रंगू लागली. इम्रानच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंटही केल्या आहेत. ‘डॉन 3 साठी शेवटी काहीतरी चांगलं झालं.’,असं एका युजरने लिहिलं. तर, इमरान आणि रणवीरचा नायक-खलनायक कॉम्बो चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट’ असल्याचे दुसऱ्या एका युजरने म्हटलं.

‘टायगर 3’मध्ये विलेनच्या भूमिकेत दिसला होता इमरान हाश्मी

इमरान हाश्मी अभिनेता सलमान खान याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही पण इम्रानच्या कामाचे मात्र खूप कौतुक झाले होते. त्यामुळे आता जर तो ‘डॉन 3’ (Don 3) मध्ये दिसून आला तर, चाहत्यांना प्रचंड आनंद होईल.

‘डॉन 3’ मुळे इमरान चर्चेत आहेतच. मात्र, त्याच्याबाबत अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या खुलास्यामुळेही सोशल मीडियावर इमरानबाबत बोलले जात आहे. “वैयक्तिक आयुष्यात आमची कोणतीच केमिस्ट्री नाही.त्याला आता ‘किसर-बॉय’ म्हटले जाते. पण, तो रियल लाइफमध्ये तसा नाहीये. आम्ही दोघेही कम्फर्टेबल किसर नाही.”, असे तनुश्री इमरानबद्दल म्हणाली होती.त्यामुळे तिच्या या विधानाचीही आता चर्चा रंगू लागली आहे.

News Title- Emraan Hashmi will be seen in Don 3

महत्त्वाच्या बतम्या- 

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Oppo Find X7 Ultra l जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असलेला OPPO Find X7 सीरीज लाँच; जाणून घ्या किंमत

Ujjwal Nikam | कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांचा ठाकरे गटाला महत्त्वाचा सल्ला!

Hero Mavrick 440 l Royal Enfield सोबत स्पर्धा करण्यासाठी Hero Mavrick 440 बाईक या तारखेला होणार लाँच!

Induction Cooking Tips l स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शनचा वापर करताय? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठे नुकसान