Travel | फक्त Lakshadweep नाही, भारतातील ‘या’ अतिसुंदर भागांमध्ये सुद्धा विनापरवाना मिळत नाही प्रवेश!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Travel | कित्येक लोकांचं परदेशात फिरायला जायचं स्वप्न असतं. मात्र परदेशात फिरायला जाण्यासाठी सर्वत्र महत्वाचं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट हवा असतो. तसेच यासोबतच परदेशात फिरायला जाण्यासाठी व्हिसा देखील (Travel) आवश्यक असतो. जर तुमच्याकडे या दोन गोष्टींपैकी एकही नसेल तर तुम्ही परदेशात प्रवास करूच शकत नाही. अशातच जर तुम्ही भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर असे काही भारतातील ठिकाण आहेत तिथे तुम्हाला परमिट घ्यावे लागते.

भारतातील या राज्यांत फिरण्यासाठी परमिट आवश्यक :

अशातच सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेलं लक्षद्वीप हे ठिकाण फिरायला जाण्यासाठी फारच सुंदर आहे. सोशल मीडियावरील तुम्ही लक्षद्वीप या ठिकाणचे फोटो पहिले असतील तर ते फारच मनमोहक आणि आकर्षक आहेत. मात्र या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट आवश्यक असते. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? भारतांतील (Travel) अशी अनेक राज्ये आहेत तिथे जाण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. तर नेमही ही ठिकाण कोणती आहेत याबद्दल आपण जाणून घेऊयात…

Travel | अरुणाचल प्रदेश :

जर तुम्हाला देशाच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशाला (Arunachal Pradesh Tourist Place) भेट द्यायची असेल तर तुम्हाला इनर लाईन परमिट आवश्यक आहे. अरुणाचल प्रदेशची सीमा चीन, भूतान आणि म्यानमारशी सलंग्न आहे.

या कारणास्तव येथे परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच तवांग, इटानगर, झिरो, अनिनी आणि भालुकपोंगला भेट देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. येथे भेट देण्यासाठी परमिटची वेळ मर्यादा 30 दिवस देण्यात आली आहे.

Travel | लडाख :

लडाख हे ठिकाण फिरण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. आयुष्यात एकदातरी लडाख (Ladakh Tourist Place) सवारी ही केलीच पाहिजे. मात्र लडाखच्या काही भागांना भेट देण्यासाठी देखील परमिट आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरच्या या भागाची पाकिस्तानशीही सीमा आहे.

त्यामुळे पर्यटकांना (Ladakh Tourist Place) लडाखला पूर्णपणे भेट देण्याची परवानगी नाही. यामध्ये हनु व्हिलेज, पँगॉन्ग त्सो लेक, त्सो मोरीरी लेक, न्योमा, लोमा बेंड आणि खारदुंग यांसारख्या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहेत. तसेच येथे परमिट एका दिवसासाठी जारी केले जाते, जे तुम्ही डीसी ऑफिसमधून घेऊ शकता.

Travel | नागालँड :

पर्यटनासाठी नागालँड हे प्रसिध्द राज्य आहे. नागालँडमध्ये सुंदर (Nagaland Tourist Place) आणि आकर्षक असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. जर तुम्ही नागालँडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण नागालँडला भेट देणाऱ्या लोकांनाही परमिट आवश्यक असते.

जर तुम्ही कोहिमा, दिमापूर, मोकोकचुंग, वोखा, सोम आणि फेकला भेट देणार असाल तर तुम्हाला परमिट लागेल. येथे तुम्हाला पॅन कार्ड किंवा मतदार कार्डद्वारे परमिट मिळू शकते. येथे तुम्हाला 15 दिवसांच्या परमिटसाठी 50 रुपये आणि 30 दिवसांसाठी 100 रुपये खर्च करावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट