Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Voter ID Card l लवकरच राज्यात लोकसभा व विधानसभा या महत्वपूर्ण निवडणुका सुरु होणार आहेत. त्यामुळे मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड (Voter ID Card) असणं आवश्यक आहे. पण मतदान ओळखपत्राचा वापर हा फक्त निवडणुकांसाठीच होत नसून हा मनुष्याचा पुरावा म्हणून देखील ते ग्राह्य धरले जाते. परंतु बऱ्याचदा वोटर आयडी कार्डवरील फोटो अनेकांचा स्पष्ट दिसत नाही किंवा तुम्हाला तो आवडलेला नसतो.

फोटो अपडेट करण्याची चिंता नाही! :

आता अशावेळी तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. कारण आता फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन (Voter ID Card) अर्ज करता येऊ शकतो. परंतु आजच्या घडीला अनेकांना याची प्रोसेस माहिती नसते, तीच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन वोटर आयडी कार्डवरील फोटो व पत्ता कसा अपडेट करायचा.

Voter ID Card l घरबसल्या फोटो अपडेट करण्याची प्रोसेस :

– सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ जावे लागेल.

– त्यानंतर होम पेजवर Voter Services टॅबवर क्लिक करा.

– स्क्रीनवर समोर आलेल्या Correction in Voter ID वर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा Voter ID Number टाका.

– जर तुमच्याकडे या नावाचे वोटर आयडी नंबर नसेल तर My Voter ID Number is not available वर क्लिक करा.

– त्यानंतर Next बटन वर क्लिक करा.

– पुढे तुम्हाला तुमची Personal Information द्यावी लागेल. व त्यानंतर तुम्हाला Photo वर क्लिक करा.

– त्यानंतर Upload Photo वर क्लिक करा.

– पुढे Submit बटन वर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल. व त्यानंतर या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला Track Your Application टॅबवर जाऊन चेक करावे लागेल.

ही प्रॉसेस पूर्ण करण्याच्या आधी ही प्रोसेस लक्षात घ्या (Voter ID Card) :

वोटर ID वर फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 3.5 सेमी रुंद आणि 4.5 सेमी उंची असलेला फोटो द्यावा लागेल. तर या फोटोचे रिजोल्यूशन साधारण 300 डीपीआय पेक्षा जास्त असावे (Voter ID Card Photo Updates) तसेच या फोटोमध्ये तुमचा चेहरा एकदम स्पष्ट दिसेल असा असावा. त्याचबरोबर आधार कार्ड किंवा ड्राईव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र तुम्हाला निवडणूक आयोगाच्या या वेबसाइटवर सबमिट करावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या –

Swami Vivekanand Jayanti l देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व उद्दिष्ट्ये

Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी शाळा-कॅालेज बंद राहणार, शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Hardik Pandya | शिवम दुबेमुळे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं, भारतीय संघातलं स्थान धोक्यात?

Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार

Marathi News: ED ॲक्शन मोडमध्ये, सकाळी सकाळी 2 मंत्र्यांच्या घरी छापा टाकल्याने मोठी खळबळ