Swami Vivekanand Jayanti l देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व उद्दिष्ट्ये

Swami Vivekanand Jayanti l आज 12 जानेवारी 2024. आज आपल्याला दिवसभर सोशल मीडियावर राष्ट्रीय युवा दिनाबाबत पोस्ट किंवा स्टेटस पाहायला मिळतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का? नेमका राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? या दिवसाचा नेमका इतिहास व उद्देश काय आहे? का आजच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतात (Swami Vivekanand Jayanti) हा दिवस साजरा केला जातो. तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती आम्ही आज अगदी थोडक्यात देणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही नक्की वाचा..

National Youth Day l राष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास :

आज 12 जानेवारी म्हणजे अर्थातच स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand Jayanti) यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर यादिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवापिढींसाठी अनेक ठिकाणी जसे कि शाळांमध्ये, कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणेकरून युवापिढींमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी व स्वामी विवेकानंद यांचे स्मरण व्हावे.

या दिवसाबाबत अधिक बोलायचे झाले तर 1984 साली स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून देशभरात दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

राष्ट्रीय युवा दिन या दिवसाचा उद्देश नेमका काय (National Youth Day) :

1) स्वामी विवेकानंद यांच्या अमूल्य व प्रेरणादायी विचार, भूमिका आणि तसेच दृष्टीकोनाद्वारे तरुणांना प्रोत्साहित करणे हे या दिवसाचे प्रमुख कारण असल्याचे सांगतले जाते.

2) एवढेच नव्हे तर तरुणांमधील शाश्वत ऊर्जा शक्ती जागृत व्हावी

3) स्वामी विवेकानंद यांच्या सारखे जीवन व यांसारखे विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी

4) स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श विचार व तत्त्वज्ञानाकडे आजही जगभरातील तरुणांना आकर्षित करणे. त्यांचे आदर्श विचार तरुणामध्ये रुजतात.

5) या दिवसामुळे स्वामी विवेकानंद यांचे विचार व भूमिकेचा तरुणांमध्ये प्रसार होतो

6) तसेच तरुणांच्या शक्तीवर आधारित सक्षम देश बनविण्याचा मार्ग तरुणांना दाखवणे.

7) व स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण व आदर्श भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान म्हणून प्रक्षेपित करणे हे आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव