Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी शाळा-कॅालेज बंद राहणार, शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | मागील काही दशकांपासून ज्या वास्तूभोवती देशाचं राजकारण फिरत राहिलं ती वास्तू म्हणजे राम मंदिर. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी होत असून 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामललाच्या मूर्तीला अभिषेक घातला जाईल. या कार्यक्रमामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमावरून राजकारण रंगले असताना या दिवसाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी छत्तीसगडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. छत्तीसगडच्या शिक्षणमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी खासगी, सरकारी शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

छत्तीसगडचे शिक्षणमंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी ही घोषणा केली. यापूर्वी उत्तर प्रदेशातही अशी घोषणा करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. रामललाचा देशातील प्रत्येक राज्याशी आणि प्रत्येक क्षेत्राशी काही ना काही संबंध आहे. छत्तीसगडच्या लोकांमध्येही या कार्यक्रमाबाबत उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी शाळा-कॅालेज बंद

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीने काही ना काही देणगी देत आहे. याचपद्धतीने छत्तीसगडहून तांदूळ अयोध्येला पाठवले जात आहे.

छत्तीसगडमधून 3000 मेट्रिक टन तांदूळ अयोध्येला पाठवण्यात आला आहे. हा तांदूळ भगवान श्री रामललाच्या महाभंडारामध्ये वापरला जाणार आहे. अयोध्येचा महाभंडारा छत्तीसगडच्या सुवासिक तांदळाने सुगंधित होईल. 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री विष्णुदेव यांनी तांदूळ भरलेल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवून अयोध्येकडे रवाना केले होते. आतापर्यंत अयोध्येला पोहोचलेली तांदळाची ही सर्वात मोठी खेप आहे. छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांतून तांदळाची पोती एकत्र जमा करण्यात आली आहेत.

यूपी सरकारची जय्यत तयारी

अयोध्येत होणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश सरकारने खास तयारी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रामललाच्या नवीन मूर्तीच्या बहुप्रतिक्षित अभिषेक सोहळ्याच्या दिवशी उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच या भव्य कार्यक्रमाच्या दिवसाला ‘राष्ट्रीय सण’ म्हणून योगी आदित्यनाथ यांनी संबोधले.

 महत्त्वाच्या बातम्या –

Hardik Pandya | शिवम दुबेमुळे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं, भारतीय संघातलं स्थान धोक्यात?

Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार

Marathi News: ED ॲक्शन मोडमध्ये, सकाळी सकाळी 2 मंत्र्यांच्या घरी छापा टाकल्याने मोठी खळबळ

IND vs AFG | LIVE सामन्यात मोठा राडा, सामन्यानंतर मात्र रोहितच्या त्या वाक्यानं जिंकली साऱ्यांची मनं!

Rohit Sharma सोबत झाला मोठा धोका, मग शुभमन गिलने सर्वांसमोर खाल्ली शिवी!, पाहा Video