Hardik Pandya | शिवम दुबेमुळे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं, भारतीय संघातलं स्थान धोक्यात?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | अफगाणिस्तानविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात शिवम दुबेने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करून सर्वांना प्रभावित केले. भारतीय संघ अडचणीत असताना दुबेने 60 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याच खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी सामना जिंकला. तिलक वर्मा आणि दुबे यांनी तिसऱ्या बळीसाठी 29 चेंडूत 44 धावांची भागीदारी नोंदवली. भारताने पहिल्या चार षटकांतच सलामी जोडी गमावली होती. त्यामुळे यजमान संघावर दबाव आला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना मोहाली येथे खेळवला गेला.

या सामन्यात शिवम दुबेने एक बळी घेतला शिवाय 60 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. किंबहुना तो वन डे विश्वचषकापासून क्रिकेटपासून दूर आहे. हार्दिक पांड्याची जागा भरून काढण्यासाठी संघात सामील झालेल्या शिवम दुबेने सरळ षटकार आणि नंतर फाइन लेगवर चौकार मारून सामना शानदारपणे संपवला.

हार्दिक पांड्याचे वाढले टेन्शन

शिवम दुबेने चौथ्या बळीसाठी जितेश शर्मा (20 चेंडूत 31 धावा) आणि रिंकू सिंग (९ चेंडूत नाबाद 16) यांच्यासोबत सोबत 42 धावांची भागीदारी करून सामना संपवला. दुबेच्या स्फोटक खेळीमुळे भारताला विजय मिळाला. तर, एक स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील दुबेने प्रसिद्धी मिळवली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत 31 वर्षीय खेळाडूने आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवले.

गोलंदाजीत त्याने दोन षटकांत 9 धावा देऊन एक बळी घेतला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने जोरदार फटकेबाजीचे कौशल्य दाखवत शानदार अर्धशतक झळकावले. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) या खेळीमुळे टेन्शन वाढेल यात शंका नाही. कारण शिवमने संपूर्ण मालिकेत असाच खेळ केला आणि आयपीएलमध्येही छाप पाडली तर त्याला ट्वेंटी-20 विश्वचषक संघातही स्थान मिळू शकते.

शिवम दुबेची स्फोटक खेळी

स्फोटक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेला 2019 मध्ये भारतासाठी ट्वेंटी-20 आणि त्यानंतर वन डेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र खराब कामगिरीमुळे त्याला लवकरच संघातील स्थान गमवावे लागले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यानंतर तो आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा भाग आहे. चेन्नईच्या संघात जाताच तो त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. (Hardik Pandya News)

धोनीने 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात त्याच्यावर विश्वास दाखवला आणि शिवम दुबेने निराश केले नाही. इथेच तो नशीबवान ठरला आणि तीन वर्षांनंतर तो टीम इंडियात परतला. मागील वर्षी पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शिवम दुबेला भारतीय संघात स्थान मिळाले होते.

News Title: hardik pandya tension increased shivam dube

महत्त्वाच्या बातम्या –

Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार

Marathi News: ED ॲक्शन मोडमध्ये, सकाळी सकाळी 2 मंत्र्यांच्या घरी छापा टाकल्याने मोठी खळबळ

IND vs AFG | LIVE सामन्यात मोठा राडा, सामन्यानंतर मात्र रोहितच्या त्या वाक्यानं जिंकली साऱ्यांची मनं!

Rohit Sharma सोबत झाला मोठा धोका, मग शुभमन गिलने सर्वांसमोर खाल्ली शिवी!, पाहा Video

UGC NET Result Date l अखेर UGC NET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लागणार निकाल