Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poco X6 Series launched l Poco कंपनी ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनीने आता Poco X6 Pro आणि Poco X6 हे दोन मॉडेल्स भारतात लाँच केले आहेत. या बेस मॉडेलमध्ये कंपनीने Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर सील आहे. तर Pro मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra प्रोसेसर दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये AMOLED डिस्प्ले आणि 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Poco X6 Series launched l दोन्ही मॉडेल्सची किंमत काय असणार! :

Poco X6 Pro ची 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये, 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. पोको कंपनीने हे दोन्ही मॉडेल यलो, रेसिंग ग्रे आणि ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर केले आहेत. तर Poco X6 च्या 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 18,999 रुपये आणि 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

तसेच टॉप 12GB + 512GB व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्मटफोन ग्राहकांना जानेवारीपासून फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार आहेत.

Poco X6 Pro आणि Poco X6 चे स्पेसिफिकेशन्स :

कंपनीने लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन Android 14 आधारित HyperOS वर चालतात. दोघांना 3 OS अपग्रेड आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे.

Poco X6 Pro मध्ये MediaTek चा Dimensity 8300-Ultra प्रोसेसर आहे. तर स्टँडर्ड मॉडेलवर Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या सिरीजमध्ये ग्राहकांना 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी, Poco X6 आणि X6 Pro मध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा आहे. Poco X6 Pro आणि Poco X6 मध्ये 5,000mAh आणि 5,100mAh बॅटरी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

School | शाळेची प्रार्थना सुरु असताना बेशुद्ध होऊन पडला मुलगा, सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Rohit Sharma | रोहित शर्माकडून घडली मोठी चूक, ICC च्या कचाट्यातून थोडक्यात वाचला नाहीतर…

‘या’ कारणामुळे Aamir Khan ढसा ढसा रडला!

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव