First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

First Flying Car Booking l दररोजच्या जीवनात आपल्याला दिवसातून एकदातरी ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकच्या त्रासामुळे आपण शक्यतो घराबाहेर जाणे टाळतो. मात्र दररोजच खूप जास्त वेळ ट्राफिकमध्ये अडकल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आता अशातच ट्रॅफिकच्या त्रासापासून सुटका होणार आहे. (First Flying Car Booking)

First Flying Car Booking l जगातील पहिली उडणारी कार :

नुकतंच अमेरिकेतील लास वेगासमध्ये चीनी तंत्रज्ञान कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने XPeng Aero HT ने फ्लाइंग कारची अनोखी संकल्पना सादर केली आहे. कंपनीच्या या नवीन संकल्पनेनुसार कमी उंचीवर उडणारी जगातील पहिली उडणारी कार (First Flying Car Booking) लवकरच सादर होणार आहे. तर आज आपण या सुपर व्हेरियंट विषयी जाणून घेऊयात…

कमी उंचीवर उडणारी जगातील पहिली उडणारी XPeng Aero HT फ्लाइंग कार ट्रॅफिकमध्ये अडकली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नसणार आहे. कारण XPeng Aero HT फ्लाइंग कार ही उडणारी कार ट्रॅफिकमध्ये उभी असताना देखील टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. त्यामुळे ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतरही तुम्हाला त्यातून बाहेर पडताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचू शकतो.

फ्लाइंग कार कधी लाँच होणार? (First Flying Car Booking) :

XPeng Aero HT फ्लाइंग कार ही अमेरिकेतील लास वेगास येथे वर्षातील सर्वात मोठा टेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये XPeng Aero HT फ्लाइंग कारचा प्रोटोटाइप सादर करण्यात आला होता. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक पायलटेड आहे. ही कार उभी असताना देखील टेकऑफ आणि लँडिंग करू शकते.

महत्वाचं म्हणजे XPeng Aero HT ने ही कार डिझाईन केली आहे. XPeng Aero HT ने फ्लाइंग कारचा अधिकृत व्हिडिओ जारी केला आहे. कंपनी 2013 पासून ही कार विकसित करत आहे. व्हिडिओमध्ये कंपनीने सततच पहिल्या फ्लाइंग कारच्या वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल माहिती दिली आहे.

First Flying Car Booking l कंपनीने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये ही कार कशी विकसित करण्यात आली आहे हे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, XPeng Aero HT फ्लाइंग कारचे बुकिंग 2025 पासून सुरू होईल आणि ही कार सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

Swami Vivekanand Jayanti l देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व उद्दिष्ट्ये

Ram Mandir उद्घाटनाच्या दिवशी शाळा-कॅालेज बंद राहणार, शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Hardik Pandya | शिवम दुबेमुळे हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं, भारतीय संघातलं स्थान धोक्यात?

Poco X6 Series launched l Poco कंपनीचा नवीन फोन लाँच; पाहा फोनची किंमत किती असणार