Neetu Kapoor | याराना, खेल खेल मे, कभी कभी यासोबतच अनेक मोठ्या चित्रपटांत काम करत अजूनही बॉलीवूडमध्ये आपलं स्थान कायम राखणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सीजन 8’या (Koffee With Karan Season 8) शो मध्ये हजेरी लावली. नीतू सिंह यांनी यावेळी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे केले.
मुलगा रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नानंतर त्यांच्यात काय बदल झाले, आलिया भट आणि तिचे कुटुंब यांच्याशी कसं जुळवून घेतलं जातं, या सर्व गोष्टींवर त्यांनी खुलासे केले. रणबीर आणि आलिया यांची मुलगी राहाच्या जन्मानंतर आमचं आयुष्य बदलल्याचंही त्यांनी सांगितलं.
“आलियाच्या आईसोबत होतात कायम वाद”
सून आलिया भटची आई सोनी राजदानबद्दल बोलताना नीतू कपूर (Neetu Kapoor) म्हणाल्या की, “सोनी आणि माझ्यामध्ये नेहमीच वाद होत असतात. राहाने अगोदर रणबीरला बाबा म्हणावं असा माझा हट्ट असतो आणि राहाने पहिल्यांदा आई म्हणावं असं सोनी यांचा हट्ट असतो. त्यामुळे गोष्टीमुळे आमच्यात नेहमीच वाद होतात. मात्र, आम्ही दोघीही राहाला आई-बाबा बोलायला शिकवत असतो.”
पुढे त्यांनी म्हटलं की,”राहाला घेण्यासाठी सर्वच आतुर असतात. ती खेळत असताना ती कुणाकडे बघते, यावरूनही आम्ही भांडत असतो. “, असं नीतू म्हणाल्या आहेत. त्यांच्या या व्यक्तव्याची आता चर्चा होत आहे. पुढे नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना आलिया आणि रणबीरच्या नात्याबद्दलही प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वच जण नीतू यांचे कौतुक करत आहेत.
रणबीर आणि आलिया या दोघांनाही माहितीये त्यांना काय करायचं आहे, आणि ते काय करत आहेत. प्रत्येक पिढीमध्ये भिन्नता असते. गरजेचं नाही, आम्ही जे केलं तेच आमच्या मुलांनीही करावं. त्यामुळे मी माझ्या सुनेला आणि मुलाला त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू देते, असं नीतू कपूर म्हणाल्यात.
ऋषी कपूरबद्दल केला मोठा खुलासा
यावेळी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचं नातं कसं होतं, याबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या. आम्ही एकत्र घालवलेला वेळ आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ होता. आम्ही खूप मस्ती करायचो. खरंच ते दिवस खूप भारी होते. पण, एक बॉयफ्रेंड म्हणून ऋषी कपूर वागण्याच्या बाबतीत खूपच कठोर होता. त्याला माझं पार्टी करणं बिलकुल आवडत नव्हते. त्यामुळे त्याने माझं पार्टी करणंच थांबवलं होतं. मी काय करायला हवं, काय नाही या प्रत्येक गोष्टीत तो पडायचा. त्यामुळे मला कधीही मोठ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होता आलं नाही, असा खुलासाही यावेळ नीतू कपूर यांनी केला.
News Title- Neetu Kapoor disclosed
महत्त्वाच्या बातम्या-
Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार
Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप
Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी