Mahalakshmi | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ, पती ICU मध्ये दाखल

Mahalakshmi | साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी (Mahalakshmi) आणि दिग्दर्शक रवींद्र चंद्रशेखर (Ravindra Chandrashekhar) यांनी 2022 मध्ये लग्न केलं होतं. महालक्ष्मीने रवींद्रसोबत दुसरं लग्न केलं होतं. यापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. या जोडीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रतिक्रियांचा भडिमार पडला होता. महालक्ष्मी आणि रवींद्र यांच्या दिसण्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

त्यातच रवींद्रचा रंग आणि वजन वरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. काहींनी तर महालक्ष्मीने फक्त पैशांसाठी लग्न केल्याचंही म्हटलं होतं. आता या जोडीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर या जोडप्याला कठीण दिवसातून जावं लागतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महालक्ष्मीचा (Mahalakshmi) पती तथा दिग्दर्शक रवींद्र चंद्रशेखरच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला आयसीयूत दाखल केलं आहे.

रवींद्रला आयसीयूत दाखल करण्यात आले

रवींद्र चंद्रशेखर हा लिब्रा प्रॉडक्शन्सचा मालक आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी रवींद्रच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या त्याला आयसीयूमध्येच ठेवण्यात आले आहे. येथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अभिनेत्री महालक्ष्मीने (Mahalakshmi) छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. युट्यूबवरही तिचं प्रसिद्ध चॅनल आहे. तिने ‘ऑफिस’, ‘थिरु मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी रानी’ आणि ‘चेल्लामय’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

रविंद आणि महालक्ष्मीची भेट ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. या दरम्यानच त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. नंतर त्यांनी 2022 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. रवींद्रने ‘सुट्टा कढाई’ , ‘नालानुम नंदिनीयुम’, ‘कोलाई नोक्कू पारवई’ आणि ‘कल्याणम’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महालक्ष्मी आणि रवींद्र सोशल मिडियावर ट्रोल

रविंद आणि महालक्ष्मी (Mahalakshmi) यांच्या लग्नानंतर त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. सोशल मिडियावर त्यांच्या जोडीची खिल्ली उडवण्यात आली. रवींद्रचे वजन अधिक असल्याने लग्नात महालक्ष्मी त्याच्यासमोर खूपच लहान दिसत होती.यावरूनच, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात घटस्फोट झाल्याचीही चर्चा होत होती. मात्र, नंतर महालक्ष्मीने दोघांचे फोटो पोस्ट करत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. रवींद्रची तब्येत खालावल्याने महालक्ष्मीचे चाहते आता त्याची लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत.

News Title- Mahalakshmi husband hospitalized in ICU

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट