Sharad Mohol | ‘तो’ प्लॅन फेल गेला अन्…; शरद मोहोळ हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

मुंबई | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. भरदिवसा त्याच्याच घरासमोर शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून आता पुन्हा एक मोठी माहिती समोर आली आहे.

Sharad Mohol हत्या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची या वकिलांसोबत आधीच मीटिंग झाली होती, अशी माहिती समोर आलीये.

“तो प्लॅन फेल गेला”

5 जानेवारीला , त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच शरदची हत्या झाली. पण तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्लॅन फेल गेला.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहळ याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात आरोपींना यश मिळालं नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. ॲडव्होकेट. संजय उढाण याचं एका हत्याकांडातील एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

मोहोळ याच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲ ड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही वकिलांना शरद मोहोळच्या खुनाच्या प्लानची संपूर्ण माहिती होती, असंही पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं.

Sharad Mohol | काय आहे प्रकरण?

शरद मोहोळ (Sharad Mohol) याला मारण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीनेच कट रचला होता. शिवाय मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर यांनीच शरदवर मागून गोळ्या झाडल्या. दरम्यान, शरदला मारण्यासाठी कट रचत असताना 15 डिसेंबरलाच सर्व आरोपी भेटले होते.

शरदला मारणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये रवींद्र वसंत पवार व संजय रामभाऊ उढाण या दोन वकिलांचा देखील समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट