Narendra Modi | ‘आई, बहीण आणि मुलींच्या नावाने…’; नरेंद्र मोदींचं तरूणांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज नाशिकमध्ये होते. नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

नरेंद्र मोदींचा तरुणांना महत्त्वाचा सल्ला

ड्रग्सपासून दूर राहा. आई, मुलगी, बहीण यांच्या नावाने शिव्या देऊ नका. अशा शिव्या देण्याच्या सवयींविरोधात आवाज उठवा. हे प्रकार बंद करा. मी लालकिल्ल्यावरून हाच आग्रह धरला होता. आज पुन्हा हा आग्रह धरत आहे, असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे.

देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या तीनमध्ये झाली आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन आता देशात होत आहे. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. यासर्वांचे आधार भारताचे युवापिढी आहेत. भारताच्या युवकांचे सामार्थ्यमुळे भारताचा डंका जगात वाजत आहे. भारताचा या यशामागे युवापिढी आहे, असंही ते म्हणालेत.

Narendra Modi | “माझा सर्वाधिक भरवसा तुमच्यावर…”

तुम्ही 21 व्या शतकातील सर्वात भाग्यशाली पिढी आहात. तुम्ही देशाला नव्या उंचीवर नेण्याचं काम करू शकता. भारतातील तरुण हे लक्ष्य गाठू शकतात. माझा सर्वाधिक भरवसा तुमच्यावर आहे. मेरा युवा भारत संघटनेशी वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण जोडले जात आहेया संघटनेत 1 कोटी 10 लाख तरुणांनी नाव नोंदणी केली आहे. तुमचं सामर्थ्य आणि तुमचा सेवाभाव देश आणि समाजाला नव्या उंचीवर नेईल, असं मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठं योगदान दिलं. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच प्राण दिले. त्यांनीच देशाला नवी दिशा दाखवली. आज अमृत काळात तुमच्यावर तीच जबाबदारी आहे. आता अमृतकाळात तुम्हाला भारताला नव्या उंचीवर न्यायचं आहे. तुम्ही असं काम करा की पुढच्या शतकात त्यावेळची पिढी तुमचं स्मरण करे, असं मोदींनी म्हटलंय.

दरम्यान, राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवीसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक महापुरुष घडले, असं मोदींनी म्हटलंय

महत्त्वाच्या बातम्या- 

Mahalakshmi | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ, पती ICU मध्ये दाखल

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु