मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा

Mumbai l मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ 10 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी 30 मे पासून 5 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

कुठे होणार पाणीकपात? :

पाणी साठा शक्य तितक्या काळ टिकेल याची खबरदारी म्हणून 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करणार असल्याचे नागरी संस्थेने सांगितले आहे. त्यात ठाणे महापालिका आणि भिवंडी निजामपुरा महापालिकेला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचाही समावेश असणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1,40,202 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे आणि 14,47,363 दशलक्ष लिटरच्या वार्षिक गरजेच्या हे केवळ 9.69 टक्के आहे.

गगराणी यांनी 7 मे रोजी सांगितले की, शहरात पुरेसा पाणीसाठा असून 31 जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन पाण्याच्या साठ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि दररोज नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा करत असल्याचे नागरी संस्थेने सांगितलेआहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही आणि जलसाठ्यातील उपयुक्त साठा सुधारत नाही तोपर्यंत पाणीकपात सुरू राहणार आहे.

Mumbai l मुंबईकरांनो मशीनमध्ये कपडे धुणे टाळा :

BMC प्रशासन सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत आहे. बीएमसीने मशिनमध्ये कपडे धुणे आणि शॉवर टाळणे यासारख्या सूचना दिल्या आहेत, तर रेस्टॉरंट्सना गरज असेल तेव्हाच पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2021 आणि 2022 मध्ये मान्सून सक्रिय होता. परंतु, ऑक्टोबर 2023 मध्ये इतका पाऊस झाला नाही, परिणामी पाणीसाठा मागील वर्षांच्या तुलनेत 5.64 टक्क्यांनी कमी झाला. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेवर येईल असा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.

News Title – Water Cut In Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?