कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक

Pune Accident l पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने आणखी एका डॉक्टराला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वैद्यकीय अहवालात अनियमितता आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप डॉक्टरावर करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.

आरोपी वेदांतच्या ब्लड टेस्ट संदर्भात डॉक्टरांना अटक :

कल्याणीनगर भागात अल्पवयीन वेदांत अग्रवाल या तरुणाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना 18 मे ला घडली होती. यामध्ये त्या दोन्ही तरुणांनाच मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे अल्पवयीन वेदांतच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र आता यासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांतच्या ब्लड टेस्ट संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. वेदांतचे घटनेवेळी अल्कोहोल घेतले होते की नाही याबाबत खुलासा करण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी वेदांतच्या ब्लड टेस्ट मध्ये अदलाबदल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी याबाबत ससून येथील डॉक्टर अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे.

Pune Accident l फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखालाही अटक :

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती आहे.

तत्पूर्वी शनिवारी चालकाचे अपहरण करणे, त्याला धमकावणे आणि चालकाला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना देखील अटक करण्यात आली होती. तसेच यासंदर्भात दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

News Title –sassoon hospital Dr. ajay taware arrested

महत्त्वाच्या बातम्या

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?

दुपारपर्यंत उष्णतेनं अंगाची लाहीलाही; संध्याकाळी पावसाचा धिंगाणा