Tom Wilkinson | एक वाईट बातमी समोर आली आहे. गेली चार दशके आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते थॉमस जेफ्री विल्किन्सन उर्फ टॉम विल्किन्सन (Tom Wilkinson) यांचं निधन झाला. अभिनेता आता या जगात नाही. टॉम विल्किन्सन यांच्या नावावर बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब सारखे पुरस्कार आहेत.
Tom Wilkinson चं निधन
टॉम विल्किन्सन यांचे काल म्हणजेच 30 डिसेंबर 2023 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनानंतर सर्वांनाच याची माहिती मिळाली. कुटुंबाच्या एजंटच्या निवेदनात म्हटलं आहे की, हे अत्यंत दुःखाने आहे की टॉम विल्किन्सनचे कुटुंब 30 डिसेंबर रोजी घरीच अचानक निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी अभिनेत्याची पत्नी आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.
अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते टॉम विल्किन्सन यांच्या निधनावर हॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्याचा सहकलाकार अॅन्युरिन बर्नार्ड फ्रॉम डेड इन अ वीकने ट्विट करून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तो लिहितो की टॉम विल्किन्सनच्या मृत्यूच्या बातमीने तो खूप दुःखी झाला आहे.
Tom Wilkinson dies at 75
अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की टॉम विल्किन्सनसोबत काम करताना आणि त्याला जाणून घेण्यास त्याचा खूप चांगला वेळ होता. आमच्या महान दिग्गजांपैकी एक, आता टॉमला बाय.
एन्युरिन व्यतिरिक्त, चित्रपट निर्माते स्कॉट डेरिकसन आणि गॅरेट हेडलंड यांनी देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. टॉम विल्किन्सन यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच दु:ख झालं आहे.
दरम्यान, थॉमस जेफ्री विल्किंसन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर गोल्डन ग्लोबसारखे फेमस पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. थॉमस जेफ्री विल्किंसन यांचं निधन हे 30 डिसेंबर 2023 रोजी झाले. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत होते. नुकताच त्यांच्या पत्नीकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी ही देण्यात आलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
Tea | सकाळ संध्याकाळ चहा पिणं सोडा, फक्त एवढ्या दिवसात बनाल करोडपती!
Jalgaon: सासरा लोकसभेच्या मैदानात… सुनेनंही घेतली नाही माघार; म्हणाली, “मला संधी दिली तर…”
Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद… मनस्ताप टाळायचा असेल तर आत्ताच वाचा
Asha Negi | ‘निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ