Team Indiaच्या गोलंदाजानं उडवला हाहाकार!, 11 धावांच्या आत घेतल्या 7 विकेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | भारतीय खेळाडूंचा क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा वाढताना दिसत आहे. एकिकडे भारताचा वरिष्ठ संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे अंडर 18 संघ सुद्धा आपल्या कामगिरीने समोरच्या संघांची दाणादाण उडवताना दिसत आहे.

आता एका भारतीय गोलंदाजाकडून अशी कामगिरी करण्यात आली आहे, ज्यामुळे समोरच्या संघात हाहाकार उडालेला पहायला मिळाला. अंडर 18 आशिया कप (Under-19s Asia Cup) स्पर्धेत हा प्रकार पहायला मिळाला. भारताचा (Team India ) 18 वर्षीय गोलंदाज राज लिम्बनीने नेपाळच्या संघाला नेस्तनाबूत केलं.

राज लिम्बनीच्या कामगिरीमुळे नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या 22.1 षटकांमध्ये तंबूत परतला. राजने टाकलेल्या 9.1 षटकांमध्ये त्याने 13 धावा देत 7 बळी घेतले. 11 धावा देण्यापूर्वीच त्याने हे 7 बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीचं आता मोठं कौतुक होताना पहायला मिळत आहे.

नेपाळनं अक्षरशः गुडघे टेकले-

राज लिम्बनीनं टाकलेल्या षटकांमुळे नेपाळच्या खेळाडूंना नीट खेळता देखील आलं नाही. नेपाळच्या सर्व संघाला अवघे 52 रन बनवता आल्या. या 52 रनांमध्ये देखील 13 एक्स्ट्राच्या धावा होत्या. नेपाळच्या एका खेळाडूला देखील दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. नेपाळकडून सर्वात जास्त 8 धावा खालच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या हेमंत धामीने बनवल्या.

सर्वात आधी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नेपाळच्या संघाला पहिला झटका राज लिम्बनीनेच चौथ्या षटकात दिला. सलामीचा खेळाडू दीपक बोहराला त्याने बाद केलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी (Team India ) नेपाळच्या संघाला आपले गुडघे टेकवायला भाग पाडलं.

अफगाणिस्तानला लोळवलं, पाकविरुद्ध मात्र अपयश-

राज लिम्बनीने याआधी झालेल्या सामन्यांमधील पहिल्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन विकेट्स मिळवल्या होत्या, या सामन्यातील विकेट्स बघता त्याने मागच्या तीन सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र राज महागडा खेळाडू ठरला होता, एकही विकेट्स न घेता त्याने 10 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या होत्या.

News Title: asia cup team india raj limbani

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर

RBI | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर

Manoj Jarange | जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!