IPL 2024 Auction | “किती पण ओता पैसा… पण हा 17 वर्षाचा खेळाडू आपल्याच संघात हवा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Auction ला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, अशातच आता IPL च्या वर्तुळात एका खेळाडूची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या खेळाडूला खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सपासून ते थेट मुंबई इंडियन्सपर्यंत दिग्गज संघ या खेळाडूवर बोली लावण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं वय ऐकाल तर तुम्ही पण थक्क व्हाल कारण हा खेळाडू सध्या फक्त 17 वर्षांचा आहे.

नेमका कोण आहे हा खेळाडू?-

IPL 2024 Auction मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अवघा 17 वर्षांता गोलंदाज क्वेना मफाकाला (kwena maphaka) मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या खेळाडूला अंडर 19 आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या दांड्या गुल करताना अनेकदा पहायला मिळालं आहे, त्यामुळे या खेळाडूची एक क्रेझ तयार झाली आहे. सर्वच फ्रँचाइजींचा या खेळाडूवर डोळा असल्याची माहिती आहे.

दक्षि आफ्रिकेच्या अंडर 19 संघाचा खेळाडू असलेल्या क्वेना मफाकाचं वय अवघं 17 वर्षे आहे, मात्र त्याच्या वयावर अजिबात जाऊ नका कारण त्याच्या चेंडूचा वेग तर खतरनाक आहेच शिवाय त्याच्या चेंडूला मिळणारा स्विंग देखील चकीत करणारा आहे. उंचीला चांगला असेला मफाका आयपीएलमध्ये (IPL 2024 Auction) सहभागी झाला तर आपल्या गोलंदाजीने भल्याभल्यांच्या विट्ट्या उडवताना दिसू शकतो.

सगळ्यांना हवा क्वेना मफाका-

क्वेना मफाका माहीत नाही अशी फ्रँचाईशी शोधून सापडणार नाही. त्याचं नाव जेव्हा ऑक्शन लिस्टमध्ये आलं तेव्हा सोशल मीडियावर या नावाची एकच चर्चा सुरु झाली. IPL 2024 Auction लिस्टमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंमध्ये मफाका सर्वात तरुण खेळाडू आहे.

कोण लावू शकतं सर्वात मोठा डाव?

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 5 वेळा IPL किताब आपल्या नावावर करणारा मुंबई इंडियन्स संघ युवा खेळाडूंवर बोली लावण्यात सर्वाधिक माहीर आहे. त्यांनी डेवाल्ड ब्रेविसला (ज्युनियर एबी) आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सने मफाकावर बोली लावली तर आश्चर्य वाटू नये.

मफाका तरुण असल्यासोबतच तो एक वेगवान गोलंदाज असून कमी वयामुळे तो बोली लावणाऱ्या संघासाठी लंबी रेस का घोडा ठरु शकतो. त्याची देहबोली काही अंशी दक्षिण आफ्रिकेचाच वेगवान गोलंदाज कागिसो रबाडासारखी मानली जाते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मफाका बॅटिंगसुद्धा करु शकतो, मात्र त्याचं बॅटिंगचं रेकॉर्ड अद्याप हवं तेवढं चांगलं नाही.

News Title: ipl 2024 auction who is kwena maphaka

महत्त्वाच्या बातम्या-

Team Indiaच्या गोलंदाजानं उडवला हाहाकार!, 11 धावांच्या आत घेतल्या 7 विकेट

Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर

RBI | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर