RBI | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी कर्जमाफीची ऑफर देऊन दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बनावट असल्याचं सांगत कर्जदारांना इशारा दिला आहे.

RBI चा कर्जदारांना इशारा

सध्या सोशल मीडियावर कर्जमाफीशी संबंधित जाहिराती व्हायरल होत आहेत. ज्याला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बनावट म्हटलं आहे.

या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे कर्जदारांना आमिष दाखवलं जात आहे. कर्जमाफी प्रमाणपत्राच्या नावाने पैसे वसूल केले जात आहे. या बाबी लक्षात घेऊन सेंट्रल बँकेने सोमवारी अलर्ट जारी केला आहे.

RBI काय म्हणालं?

आरबीआयने सांगितलं की, “काही ठिकाणी, काही व्यक्तींकडून अशा मोहिमा राबवल्या जात आहेत, ज्यामुळे बँकांकडून घेतलेल्या सिक्युरिटीजवर त्यांचे अधिकार लागू करण्याच्या बँकांच्या प्रयत्नांना हानी पोहोचते.

बँका आणि इतर वित्तीय संस्थांची थकबाकी परत करण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था करत आहेत. यामुळे बँकेसह ठेवीदारांचं देखील आर्थिक नुकसान होऊ शकतं.”

अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका, असं RBI ने म्हटले आहे. सेंट्रल बँकेने अशा एजन्सी आढळल्याबरोबर कळवण्याचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर

Manoj Jarange | जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta | ‘माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता, तो माझ्याकडे…’; नीना गुप्तांचा खुलासा