रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | आगामी आयपीएल हंगामाआधी Mumbai Indians ने मोठा निर्णय घेतला. मुंबईने संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली. आता रोहित शर्मा आयपीएलमध्ये कर्णधार नसेल. यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते संतापले आहेत. हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही.

Mumbai Indians मोठा धक्का

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावलंय. आता मात्र रोहितला कर्णधारपदावरून काढल्याने चाहते प्रचंड भडकले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या अकाउंटवर व्हिडीओखाली चाहते अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड चालवत आहे. एका चाहत्याने मुंबई इंडियन्सचा झेंडा आणि जर्सी जाळतानाचा फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे आजपासून मी मुंबई इंडियन्सचा पाठिराखा नाही.

Mumbai Indians | रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

मुबंई इंडियन्सला रोहित शर्माशिवाय चाहते बघू शकत नाही. कारण रोहितमुळेच बरेच जण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होते. यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जातोय. चेन्नईचं कर्णधारपद धोनी 40 वर्षानंतरही करत असेल तर रोहितला कायम का ठेवलं नाही? असा सवाल विचारण्यात येतोय.

रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलंय. 2013 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिले आयपीएल जेतेपद पटकावल.

मुंबईसाठी रोहित शर्मा हिरो ठरला. जे काम सचिन, भज्जी अन् पाँटिंगला करता आले नाही, ते युवा रोहित शर्माने करुन दाखवलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका!

Rohit Sharmaसाठी अत्यंत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सनंतर आता ‘हे’ मोठं कर्णधारपदही जाणार?