Rohit Sharmaसाठी अत्यंत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सनंतर आता ‘हे’ मोठं कर्णधारपदही जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | आयसीसी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर रोहित शर्माच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याचं दिसतंय. नुकतंच रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. रोहित शर्मा तसेच त्याच्या चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बातमी असतानाच आता रोहित शर्माच्या हातून आणखी एक मोठं कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma ) हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारताने नुकतीच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. याशिवाय तो मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, त्याच्या नेतृत्त्वात मुंबईनं आयपीएलची पाच विजेतेपदं मिळवली. असं असलं तरी त्याच्या कारकीर्दीला आता उतरती कळा लागली असल्याचं दिसत आहे.

मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचं मुंबई इंडियन्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तसेच रोहित शर्माच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज असून तो ते करण्याची आम्ही वाट पाहतोय, असं त्यांनी म्हटलंय. हा रोहित शर्मासाठी एक धक्का मानला जात असताना आता यापेक्षा मोठं असलेलं कर्णधारपद सुद्धा रोहितला मिळणार नसल्याची चर्चा आहे.

कोणतं कर्णधारपद रोहितला मिळणार नाही?

2024 सालचा T20 World Cup जवळ आला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या वर्ल्डकपची भारतीय क्रिकेट संघाने देखील जोरदार तयारी चालवली आहे. सर्वोत्तम संघ या स्पर्धेत खेळवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा मानस आहे, त्या दृष्टीने रोहित शर्माच्या हाती भारतीय संघाचं नेतृत्त्व असावं, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती, मात्र आता ही इच्छा इच्छाच राहण्याची शक्यता आहे.

वनडे वर्ल्डकपमधील रोहित शर्मा (Rohit Sharma) तसेच भारतीय संघाची कामगिरी पाहता रोहित शर्माच्या हाती T20 World Cup साठी कर्णधारपद दिलं जाऊ शकतं असं मानलं जात होतं, मात्र फायनलमध्ये हरल्यानंतर ही शक्यता कमी झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडेच या स्पर्धेसाठीचं कर्णधारपद जाण्याची शक्यता वाढली आहे.

रोहित फक्त कसोटी सामने खेळणार?

मुंबई इंडियन्सनं ज्या प्रकारे भविष्यातील गरज ओळखून हार्दिकला कर्णधारपद दिलं आहे, त्याच प्रकारे हार्दिककडे असलेलं T20 संघाचं कर्णधारपद त्याच्याकडेच राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच रोहित शर्माने गेल्या वर्षभरात T20 सामने खेळले नसल्याची माहिती आहे आणि आगामी काळात फारच कमी दौरे असल्यानं तो T20 सामने खेळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व दिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. वनडे संघातील त्याचं स्थान धोक्यात आहे, त्यामुळे आगामी काळात रोहित शर्मा फक्त कसोटी सामन्यांमध्येच खेळताना दिसू शकतं, असं मानलं जात आहे.

News Title: Rohit Sharma Hardik Pandya and Indian T20 Team Captaincy

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सने Rohit Sharmaला कर्णधारपदावरुन का काढलं?, समोर आलं मोठं कारण

Mumbai News | मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात ‘या’ व्हायरसची झपाट्याने वाढ

Shreyas Talpade | ’10 मिनिटं त्याचं हृदय…’; बॉबी देओलचा मोठा खुलासा

रोहित शर्माची सुट्टी! Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?