मुंबई इंडियन्सने Rohit Sharmaला कर्णधारपदावरुन का काढलं?, समोर आलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाच वेळा IPL चा किताब जिंकून देणारा रोहित शर्मा आता संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचं कर्णधार करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. सध्या तरी या निवडीवरुन क्रीडा वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पहायला मिळत आहे.

मुंबई इंडियनचा हा निर्णय रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांसाठी धक्का मानला जात आहे, मात्र क्रिकेटच्या जाणकारांच्या मते हे होणार हे नक्की होतं. एका ट्रेडच्या माध्यमातून जेव्हा 15 कोटी रुपये खर्चून मुंबईने हार्दिकला गुजरातकडून परत घेतलं तेव्हाच काहींच्या मते हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार असल्याचं पक्कं झालं होतं. आता फक्त त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

रोहितला कर्णधारपदावरुन का काढलं?

जाणकारांच्या मते, रोहित शर्माचं वाढतं वय पाहता मुंबई इंडियन्सला आपल्या भविष्यासाठी एका नव्या नेतृत्त्वाची गरज होती. आयपीएलच्या गेल्या काही मोसमांमधील मुंबईची कारकीर्द फारशी समाधानकारक राहिलेली नाही. त्यातच T20 सामन्यांमध्ये खेळणं रोहित शर्मानं कमी केलेलं दिसतंय. एका रिपोर्टच्या मते रोहित शेवटचा T20 सामना आयपीएलच्या गेल्या मोसमात खेळला होता.

मुंबई इंडियन्सच्या भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याची घोषणा करताना मुंबई इंडियन्सने जे स्पष्टीकरण दिलं आहे त्यातून सुद्धा हीच गोष्ट दिसते, की भविष्याच्या दृष्टीने विचार करुनच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय म्हटलंय मुंबई इंडियन्सने?

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने यांनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे. “मुंबईने भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, रिकी पाँटिंग यांच्यापासून रोहित शर्मापर्यंत दिग्गजांचं नेतृत्त्व मिळालं आहे. त्यांनी टीमला यश मिळवून देण्यासोबतच भविष्यात संघ अधिक बळकट करण्यासाठी योगदान दिलं आहे, याच नीतीचा भाग म्हणून हार्दिक पांड्याला आम्ही नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करत आहोत.”

“रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला दिलेल्या असाधारण नेतृत्त्वाबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो. 2013 साली मुंबईचं नेतृत्त्व स्वीकारल्यापासून त्याने फक्त संघाला यश मिळवून दिलं नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधारांमध्ये स्वतःचा समावेश केला. त्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स सर्वात चांगली आणि प्रसिद्ध टीम बनली. मुंबईला भविष्यातही आणखी मजबूत संघ करण्यासाठी आम्ही त्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहतोय आणि हार्दिक पांड्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो”, असं जयवर्धने यांनी म्हटलं आहे.

News Title: why mumbai indians replace rohit sharma with hardik pandya as captain

महत्त्वाच्या बातम्या-

Shreyas Talpade | ’10 मिनिटं त्याचं हृदय बंद पडलं होतं’; बॉबी देओलचा मोठा खुलासा

रोहित शर्माची सुट्टी! Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?

MHADA | मोठी बातमी! म्हाडाच्या घराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर