Shreyas Talpade | ’10 मिनिटं त्याचं हृदय…’; बॉबी देओलचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ‘इकबाल’ फेम बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) काल त्याच्या आगामी ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. तेथून घरी परतल्यानंतर श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याची बिघडलेली प्रकृती पाहून अभिनेत्याच्या पत्नीने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले.

Shreyas Talpade बाबत बॉबी देओलचा मोठा खुलासा

प्राथमिक उपचारानंतर अभिनेत्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. याबद्दल त्याच्या पत्नीने त्याच्या तब्येतीबाबत अपडेट चाहत्यांशी शेअर केले होते. आता अभिनेत्याचा जवळचा मित्र आणि ‘अॅनिमल’ अभिनेता बॉबी देओल याने श्रेयस तळपदेच्या (Shreyas Talpade) तब्येतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याचा श्वास कसा थांबला होता हे त्याने सांगितलं.

Shreyas Talpade | “10 मिनिटं त्याचं हृदय बंद पडलं होतं”

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, ‘मी त्याच्या पत्नीशी त्याच्या प्रकृतीबद्दल बोललो. ती खूप अस्वस्थ होती. तिने मला सांगितलं की श्रेयसच्या हृदयाचे ठोके सुमारे 10 मिनिटं थांबले होते, ज्यामुळे ती खूप घाबरली होती. लवकरच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली, असं बॉबीने सांगितलं. श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा अशी मी प्रार्थना केली. अशातच बॉबीने श्रेयसबाबत मोठा खुलासा केला आहे. ताज्या अपडेटनुसार, श्रेयस तळपदेला आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे आहेत जवळचे मित्र

आणखी एक गोष्ट जी तुम्हाला कदाचित माहित नसेल ती म्हणजे बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे हे ऑफस्क्रीन जवळचे मित्र आहेत, त्यांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो.

श्रेयस तळपदे ‘पोस्टर बॉय’मध्ये दिसला होता. या चित्रपटात बॉबी देओल आणि सनी देओल देखील मुख्य भूमिकेत होते. मात्र हा चित्रपट पडद्यावर कमाल दाखवू शकला नाही. पुरुष नसबंदीचा अपारंपरिक विषय चित्रपटाच्या कथेत दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्माची सुट्टी! Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?

MHADA | मोठी बातमी! म्हाडाच्या घराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर

Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता