Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | हवामान खात्याकडून (Weather Update) थंडीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असून 18 डिसेंबरपासून तापमानात (Weather) आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

18 डिसेंबरपासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी 2 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

10 डिसेंबररोजी सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअस ने अधिक असलेले शहराचे किमान तापमान 14 डिसेंबरपर्यंत2 अंश सेल्सिअसने घटलं आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाली. 12 डिसेंबरला कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस होते, तर 14 डिसेंबरला ते 28.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय.

Weather Update | मुंबईकरांना थंडीचा आनंद लुटता येणार

दरम्यान, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं वादळ थांबलं आहे. आता सौम्य हिवाळा सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यामुळे मुंबईकरांना रात्री थंडीचा आनंद लुटता येणार आहे.

वास्तविक, मुंबईकर थंडीची वाट पाहत असले तरी त्यांना दररोज दमट उष्णतेचा सामना करावा लागतो. उपनगरात किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान होते. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

15 आणि 16 डिसेंबर रोजी तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढणार असल्याचे हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं. त्यामुळे रात्रीचं तापमान कमी होईल.

महत्त्वाच्या  बातम्या- 

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

Love | प्रेमाचे आहेत ‘इतके’ प्रकार, तुम्हाला माहितीयेत का?

Angioplasty | श्रेयस तळपदेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया नेमकी आहे तरी काय?

Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Majhi Kanya Bhagyashree Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतं 50,000 हजार रूपये