रोहित शर्माची सुट्टी! Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सने आज एक मोठी घोषणा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. आता रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पांड्या यापुढे मुंबई इंडियन्स संघाचा नेतृत्त्व करताना दिसणार आहे.

हार्दिक पांड्याच्या IPL कारकिर्दीला मुंबई इंडियन्समधूनच सुरुवात झाली होती. 2015 साली मुंबईने हार्दिकला आपल्या संघात सहभागी केलं होतं, मुंबईने दिलेल्या या संधीचं हार्दिकने अक्षरशः सोनं केलं. त्याची मुंबईतील नवखा खेळाडू ते महत्त्वाचा खेळाडू अशी कारकीर्द राहिली. फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर तो संघासाठी एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू राहिला.

(Hardik Pandya named Mumbai Indians captain ahead of IPL 2024)

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाची एन्ट्री झाल्यावर गुजरानं हा मोहरा बरोबर हेरला आणि त्याला आपल्या संघात सहभागी केलं. एवढंच नव्हे तर गुजरातनं आपल्या संघाचं कर्णधारपद देखील त्याला बहाल केलं. हार्दिक पांड्यानं या संधीचं सुद्धा सोनं केलं. गुजरातच्या संघाला पहिल्याच मोसमात आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं आणि इथून हार्दिकच्या नव्या युगाला सुरुवात झाली.

आयपीएलच्या त्यानंतरच्या मोसमात देखील गुजरात टायटन्सनं भन्नाट कामगिरी केली. हार्दिकच्या नेतृत्त्वात त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएलची फायनल गाठली. विजेतेपद मिळवण्यात त्यांना यश आलं नाही, मात्र हार्दिकच्या नेतृत्त्वाची चांगलीच चर्चा झाली. दुसरीकडे ज्या मुंबईतून तो गुजरातला गेला होता, त्या संघाची मात्र स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी झाली नाही.

मुंबईनं का केलं हार्दिक पांड्याला कर्णधार?

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात सुरु असलेली मुंबई इंडियन्सची वाटचाल संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय बनल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईला 5 विजेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा गेल्या आयपीएलपासून एकही T20 सामना खेळलेला नाही, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या भविष्याचा विचार करुन हार्दिक पांड्याच्या हाती कर्णधारपद दिल्याची चर्चा आहे.

तेव्हाच दिलं होतं कर्णधारपदाचं आश्वासन-

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा हात सोडल्यानंतर हार्दिक गुजरातचा कर्णधार बनला होता, मात्र यंदाच्या मोसमापूर्वी मुंबईने हार्दिकला 15 कोटी रुपयांना ट्रेड करत गुजरातकडून परत घेतले. हार्दिकला पुन्हा घेतानाच त्याला कर्णधार करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. मुंबई इंडियन्सच्या या घोषणेमुळे आता या संघात रोहित शर्मा युगाचा अंत झाल्याची आणि हार्दिक पांड्या युगाची सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे.

News Title: hardik pandya replaces rohit sharma as mumbai indians captain, Takes over from Rohit Sharma, who led the team to five IPL titles.

महत्त्वाच्या बातम्या-

Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?

MHADA | मोठी बातमी! म्हाडाच्या घराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर

Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!