Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | बच्चन कुटुंबातील वाद सध्या चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरु आहेत. यावर बच्चन कुटुंबाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी अभिषेकच्या बहिणीच्या इन्स्टाग्राम पोस्टने या चर्चांना खतपाणी घातलं होतं, त्यानंतर या चर्चा आणखी जोरात सुरु आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्या प्रकरणात रोज नवनवी माहिती हाती येत आहे. आताही अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनूसार, बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्यातील संबंध इतके ताणले गेले आहेत, की ऐश्वर्या राय हिने आपलं घर सोडलं आहे आणि ती आपल्या आईकडे रहायला गलेल्याची माहिती आहे.

Aishwarya Rai | नेमकं काय काय आलं समोर?-

टाईम्स नाऊची पत्रकार प्रीतिनंदा बेहरानं आपल्या रिपोर्टमध्ये बच्चन कुटुंबातील वादाबद्दल खळबळजनक माहिती लिहिली आहे, ही माहिती समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बच्चन कुटुंबातील सूत्राच्या हवाल्याने या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “ऐश्वर्या राय सध्या बच्चन कुटुंबासोबत राहात नाही ती आपल्या आईकडे रहायला गेली आहे. ऐश्वर्या आपला दिवस दोन भागांमध्ये जगते, एकामध्ये ती तिच्या आईकडे असते तर काही काळ ती आपली मुलगी आराध्यासाठी बच्चन कुटुंबाच्या घरी येऊन राहते. यावेळी ती घराच्या एका बाजूला राहते, तर बाकी बच्चन कुटुंब याच घरात दुसऱ्या बाजूला राहतं.”

या रिपोर्टमध्ये आणखीही काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत, ज्यामध्ये म्हटलंय की, “ऐश्वर्या राय आणि सासू जया बच्चन यांचं एकमेकींशी अजिबात पटत नाही. त्या एकमेकींचं तोंड पाहणं देखील पसंत करत नाहीत. आई आणि बायकोच्या भांडणात अभिषेक पुरता अडकला आहे. आपल्या आई-वडिलाप्रति असलेली अभिषेकची बांधिलकी या भांडणाला आणखी खतपाणी घालत आहे.”

“अमिताभ यांनी जलसा बंगला आपली मुलगी श्वेताच्या नावावर केल्याने या भांडणात आणखी भडका उडाल्याचं सांगितलं जातंय. यामुळे आधीच ताणलेले संबंध आणखी खराब झाले असून ऐश्वर्यानं थेट घर सोडलं आहे. असं असलं तरी या रिपोर्टमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाबद्दल नकारात्मक चर्चा नको म्हणून घटस्फोट घेतला जाणार नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, ऐश्वर्या रायच्या बोटात नेहमी असणारी वेडिंग रिंग दिसण्याची बंद झाल्यानंतर या भांडणाची चर्चा सुरु झाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाला चांगलीच हवा मिळाली असून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याचं सांगितलं जात होतं. एवढ्या सगळ्या चर्चांनंतर बच्चन कुटुंबाने या प्रकरणावर अद्याप गप्प राहण्याची भूमिका घेतलेली आहे, बच्चन कुटुंबातील कुणी सदस्य स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत खरं काय ते जगासमोर येण्याची शक्यता नाही.

News Title: aishwarya rai leaves house of abhishek bachchan

थोडक्यात बातम्या-

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर

Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

Love | प्रेमाचे आहेत ‘इतके’ प्रकार, तुम्हाला माहितीयेत का?

Angioplasty | श्रेयस तळपदेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया नेमकी आहे तरी काय?