Mumbai News | मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात ‘या’ व्हायरसची झपाट्याने वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai News | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, आता याच अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून राज्यात थंडीची हुडहुडी सुर झाली आहे. त्यामुळे आजकाल लहान मुलं झपाट्याने आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र मुंबईमध्ये सध्या एक नवा व्हायरसने एन्ट्री केली आहे. ज्याचा परिणाम थेट तुमच्या कानावर होऊ शकतो.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये (Mumbai News) एक नवा व्हायरस पसरत आहे जो कालपर्यंत फक्त लहानांमध्ये आढळून येत होता. गालगुंड असं या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसमुळे गेले काही दिवस मुंबईतील रुग्णांच्या संखेत वाढ होताना दिसत आहे.

लहानांबरोबर आता याची लक्षणे मोठ्यांमध्ये सुद्धा दिसत आहेत. रुग्णांमध्ये आढळणाऱ्या एका लक्षणामुळे डॉक्टरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या केईएम रुग्णालयात टिटवाळ्यातील सात वर्षांच्या मुलीला गालगुंड झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

पुढे काय घडलं?

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तिला या व्हायरसची लागण झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. गालगुंडाची बाधा झाल्यानंतर तिला तिसऱ्या दिवशी ऐकू येणं बंद झालं. गालगुंडाच्या आजारात यापूर्वी बहिरेपणा येण्याचा प्रकार डॉक्टरांनी कधी पाहिला नव्हता. तिला हा आजार झाल्यानंतर डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं होतं.

काय म्हणाले डाॅक्टर?

जेव्हा गालगुंड झाला त्यावेळेस तिला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेले. दरम्यान त्यावेळी तिला ऐकू येत नव्हतं. पण  काही दिवसांनी तिला पुन्हा ऐकू येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

अनेक दिवस उलटूनही तिच्या प्रकृतीत काही फरक पडला नाही. त्यामुळे तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सध्या मुंबई येथे या व्हायरसच्या रुग्णात वाढ होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एरवी लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार आता प्रौढांनाही कचाट्यात घेताना दिसत आहे.

News Title : Mumbai news this disease is increasing in city

थोडक्यात बातम्या-

Shreyas Talpade | ’10 मिनिटं त्याचं हृदय बंद पडलं होतं’; बॉबी देओलचा मोठा खुलासा

रोहित शर्माची सुट्टी! Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

Aishwarya Rai | आई आणि बायकोच्या भांडणात अडकला अभिषेक, ऐश्वर्यानं सोडलं घर?

MHADA | मोठी बातमी! म्हाडाच्या घराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर