Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | देशातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटाचे मालक रतन टाटा (Ratan Tata) यांच्याबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. कॉलमध्ये कॉलरने रतन टाटा (Ratan Tata) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

रतन टाटांची सुरक्षा वाढवावी, अन्यथा त्यांची अवस्था सायरस मिस्त्रीसारखी होईल. हा कॉल आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने रतन टाटा (Ratan Tata) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याचबरोबर फोन करणाऱ्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Ratan Tata यांना धमकी

कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा फोन बंद होता, त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक सहाय्य आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीने कॉलरचा शोध घेतला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकातील असल्याचं समोर आलंय. फोन करणाऱ्याचा पत्ता शोधून काढला असता फोन करणारा हा पुण्याचा रहिवासी असल्याचं कळतंय.

फोन करणारा कॉलर सापडला

हा फोन करणारा कॉलर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या पत्नीनेही पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती समोर आलीये.

पोलिसांच्या चौकशीत फोन करणाऱ्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया झाला असून त्याने कोणालाही न सांगता घरून फोन घेतल्याचेही समोर आले आहे. त्याच फोनवरून त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन करून रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, फोन करणारा हा मानसिक आजारी होता, त्यामुळेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.

काही महिन्यांपूर्वी रिलायन्स कंपनीच्या अध्यक्षांनाही ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्या बदल्यात मेलरने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र व्हीपीएनच्या माध्यमातून मुकेश अंबानींना कुठेतरी बसून कोणीतरी धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना वाटतं.

महतत्वाच्या बातम्या- 

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका!