‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry चं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये तो बेशुद्धावस्थेत सापडला होता. मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.

Matthew Perry च्या ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू केटामाइनच्या ओव्हरडोजमुळे झाला. लॉस एंजेलिस काउंटी विभागाच्या वैद्यकीय परीक्षकांच्या वैद्यकीय परीक्षकांनी नोंदवलं की तो केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होता, ज्याचा उपयोग नैराश्यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

मृत्यूपूर्वी Matthew Perry वर झाली होती शस्त्रक्रिया

मृत्यूपूर्वी दीड आठवडा आधी मॅथ्यूवर शस्त्रक्रिया झाल्याचं वैद्यकीय परीक्षकांनी सांगितलंय. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या शरीरातील केटामाइनची पातळी सामान्य भूल देण्यापेक्षा कमी होती. हे औषध सहसा काही तासांत पचते. मात्र त्याच्या शरीरात त्याचे काही अंश आढळून आलंय.

रिपोर्ट्सनुसार मॅथ्यू केटामाइनच्या कमी प्रमाणामुळे बेशुद्ध झाला आणि बाथटबमध्ये बुडण्यापासून तो स्वतःला वाचवू शकला नाही. 28 ऑक्टोबर 2023 रोजी मॅथ्यू पेरीचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घराच्या हॉट टबमध्ये सापडला होता. पेरी 54 वर्षांचे होते आणि जगातील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक होते.   फ्रेंड्स’ मुळे मॅथ्यू याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. 

फ्रेंड्समध्ये मॅथ्यूने ‘चँडलर बिंग’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. सहा मित्र-मैत्रिणींची ही कहाणी 1994 ते 2004 अशी दहा वर्ष सुरू होती. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ही मालिका उपलब्ध आहे. फ्रेंड्सच्या या दहा सीझनमध्ये मॅथ्यू यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

मॅथ्यू याने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्याचं लग्न झालं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्याचं मॉली हर्विट्ज़ हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार