Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health | तुम्ही अनेकांना पाहिलं असेल की त्यांचा मूड क्षणा क्षणाला बदलतो. पण हे सामान्य नसून अनेकदा हे मानसिक आजाराचं (Mental Health) लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेत याला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात. हा आजार वाढत्या वयाबरोबर होतो आणि मेंदूच्या कार्यावर होणाऱ्या परिणामामुळे होतो. या आजाराचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

गाझियाबादच्या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागातील डॉ. ए.के. कुमार स्पष्ट करतात की बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखली जात नाहीत, परंतु जर एखाद्या व्यक्तीमध्ये अHचानक मूड बदलणे, लहान गोष्टी सोडवण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसली तर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

मानसोपचार तज्ज्ञ रुही सतीजा यांच्या मते, बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही मानसिक आरोग्य (Health) समस्यांपैकी एक क्लस्टर बी व्यक्तिमत्त्व म्हणून गणली जाते. ज्या लोकांना हा विकार आहे त्यांच्यामध्ये काही मानसिक आणि भावनिक विचार पद्धती असतात ज्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने वागतात.

-सोडलं जाण्याची भीती

या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नेहमीच भीती वाटतं की तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो त्याला सोडून जाईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात खूप अस्थिरता येते. कधीकधी तो त्याच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि पुढच्याच क्षणी तो तिला सोडून जाईल असं त्याला वाटतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा कायम आहे.

– स्वतःबद्दलही खूप विचार करणं

या विकाराने ग्रासलेली व्यक्ती स्वत:बद्दलचे विचार बदलत राहते, कधी कधी त्याला वाटतं की तो सर्वश्रेष्ठ आहे, तर कधी त्याला असं वाटते की आपल्यापेक्षा वाईट कोणी नाही. या विचारांचा त्यांच्या वागण्यावरही परिणाम होतो.

– वारंवार मूड बदलणं

या व्यक्तीचा मूड सतत बदलत राहतो, कधी तो चिडतो, कधी आत्महत्या करायचा विचारही त्या व्यक्तीला येतात.

– एकटेपणा जाणवणं

या लोकांना एकटे वाटते आणि यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढते. ज्या गोष्टींमध्ये वास्तव नसते अशा गोष्टींचा विचार करूनही हे लोक चिंताग्रस्त होतात.

महत्त्वाच्या बातम्या-