Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रोहित शर्माचा (Rohit Sharma) कर्णधारपदाचा प्रवास 15 डिसेंबर 2023 रोजी संपला. भविष्याचा विचार करून मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पुढील हंगामासाठी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं. पण आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. हा रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही.

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं कठीण

2013 च्या मोसमाच्या मध्यावर रोहितने पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्याच मोसमात संघ पहिला ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये असे रेकॉर्ड केले आहेत, जे तोडणं हार्दिक पांड्यासाठीही सोपं नाही.

आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही. या यादीत हार्दिक पांड्या आणि शेन वॉर्नचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये या दोघांनी कर्णधार म्हणून त्यांच्या 15 व्या सामन्यात संघाला विजेतेपदापर्यंत नेलं.

यानंतर रोहितने 44 वा सामना खेळताना मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार म्हणून दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली. या प्रकरणात रोहितने त्याच्या 59 व्या सामन्यात कर्णधार म्हणून दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीचा विक्रम मोडला होता. यानंतर रोहितने 75 व्या सामन्यात कर्णधार म्हणून तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर धोनीने तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली तेव्हा कर्णधार म्हणून 159 वा सामना खेळला.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

रोहित शर्माची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद पटकावलं. यामध्ये रोहितने कर्णधार म्हणून 104 व्या सामन्यात चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.

पाचव्यांदा जेव्हा मुंबई इंडियन्सचा विजय झाला होता, तेव्हा कर्णधार म्हणून रोहितचा हा 116 वा सामना होता. रोहितने आयपीएलमधील 158 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी 87 सामने संघाने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका!

Rohit Sharmaसाठी अत्यंत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सनंतर आता ‘हे’ मोठं कर्णधारपदही जाणार?

मुंबई इंडियन्सने Rohit Sharmaला कर्णधारपदावरुन का काढलं?, समोर आलं मोठं कारण

Mumbai News | मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात ‘या’ व्हायरसची झपाट्याने वाढ