‘या’ गोष्टी जवळच्या मित्रालाही सांगू नका; अन्यथा होईल घात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले गेले आहेत. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले. चाणक्य यांचे (Chanakya Niti) खरे नाव विष्णुगुप्त होते. त्यांना कौटिल्य असेही म्हणतात.

आचार्य चाणक्य मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते, ज्यांनी चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्थशास्त्र, चाणक्य नीति, नीतिशास्त्र आणि मुद्राराक्षस या त्यांच्या प्रसिद्ध रचना आहेत.

चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते. त्यांची नीती आणि धोरणांचा अवलंब केला तर, तुम्ही एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता. चाणक्य यांनी मित्र आणि काही वैयक्तिक गोष्टींबद्दल असं काही सांगितलं आहे, ज्याचा अवलंब प्रत्येकाने करायलाच हवा.

मित्राला ‘या’ गोष्टी सांगू नयेत

चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti)असं सांगितलं आहे की, काही गोष्टी या आपल्या जवळच्या मित्रालाही सांगितल्या नाही पाहिजेत. कारण, याच गोष्टी पुढे जाऊन आपल्यालाच अडथळा ठरू शकतात. त्यामुळे मित्रावर डोळे बंद करून लगेच विश्वास ठेऊ नये, अन्यथा आपलाच मोठा घात होऊ शकतो.

न विश्वसेत् कुमित्रे च, मित्रे चापि न विश्वसेत्।
कदाचित् कुपितं मित्रं, सर्वं गुह्यं प्रकाशयेत्।।

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही मित्रावर पूर्ण विश्वास ठेवू नका आणि त्याच्यावर पूर्ण अविश्वासही दाखवू नका. कारण कधी कधी रागावलेला मित्र आपल्या सर्व गुपीतांचा खुलासा करत असतो. म्हणून आपण खऱ्या मित्राला शांततेत समजावून सांगायला पाहिजे. मात्र, त्याच्यावर पूर्णपणे विश्वासही दाखवू नये.

..म्हणून मित्रावर विश्वास ठेऊ नये

चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) तुमचे काम पूर्ण होईपर्यंत एक शब्दही उच्चारू नये. आपलं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण त्याचा खुलासा करू नये. यासोबतच असे शब्द अजिबात बोलू नयेत ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो.

खरं तर, तुम्ही डोळे मिटून वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून राहू नये. मानवी प्रवृत्ती बदलत राहतात. समोरचा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि तुम्ही त्यांना काय सांगताय, यावर तो पुढे काय व्यक्त करेल, याची माहिती नसते. त्यामुळे विचार करूनच बोलायला हवं.

कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे समोरच्याला इच्छा नसतानाही तुम्ही संगीतलेली गोष्ट सांगावी लागू शकते. किंवा जर तो रागात असला तर तुमची गुपिते समोर आणू शकतो.त्यामुळे मित्राला काही गोष्टी सांगताना विचार करूनच सांगायला हवं.

News Title- Chanakya Niti for friendship

महत्त्वाच्या बातम्या –

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल