एकनाथ शिंदे पोहोचले थेट पाकिस्तान सीमेवर, केली ही सर्वात मोठी कामगिरी!

 नवी दिल्ली | भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील कुपवाडा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला, या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे. आम्ही पुणेकर संस्था, 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.

नेमकी मुख्यमंत्र्यांनी कोणती अभिमानास्पद गोष्ट केली?

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुतळा बसवण्यात आला. भारत-पाकिस्तान सीमेवर बसवण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलाच अश्वारूढ पुतळा आहे.

Shivaji Maharaj

भारत पाकिस्तान सीमेवर मुख्यमंत्र्यांच्या घोषणा-

पुतळ्याच्या अनावरण केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं याठिकाणी भाषण सुद्धा झालं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यावेळचा जल्लोष पाहण्यासारखा होता. अगदी पाकिस्तानमध्ये आवाज पोहचला पाहिजे, इतक्या मोठ्याने जयघोष करा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला.

मुख्यमंत्री शिंदेंचं यावेळचं भाषण लक्षवेधी ठरलं. “अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज थेट पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज इथे असल्याने शत्रू इथे पाऊल सुद्धा पुढं ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून इथले दहशतवादी सुद्धा काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाहीत”, असा दावा शिंदे यांनी केला.

Eknath Shinde 1 2

शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल पुन्हा मोठी घोषणा-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला आहे, ती आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार परदेशवारी सुद्धा करुन आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाघनखांचा विषयही यावेळी काढळा. महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखं राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा तोंडभरुन कौतुक केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!