सरकार अडचणीत येणार?; आता ‘या’ समाजाने दिला मोठा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह (Chhagan Bhujbal) ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. सरकारने मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण देऊन, ओबीसी समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे, असा आरोप छगन भुजबळांनी केला होता. आज त्यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणासाठी राज्यभर आंदोलनं आणि मेळावे घेण्याचा निर्णय ओबीसी नेत्यांनी घेतला आहे. याबाबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी माहिती दिली.

ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे. ही प्रस्थापित मंडळी करत आहेत. सर्व खासदार, आमदार यांचेच आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रातील सरकारही याचंच आहे. त्यामुळे ओबीसींनी एकजुट व्हावं. दिवाळीनंतर ओबीसींचा पहिला मेळावा होणार आहे. जालना जिल्ह्यातील आंबडमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर राज्यभर मेळावे होणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.

शेंडगे म्हणाले “निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असं सरकाने म्हटलं होत. मात्र संपुर्ण महाराष्ट्रात शिंदे समितीला नोंदी शोधायला सांगितलं आहे.

राज्यातील संपुर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन, ओबीसी समाजामध्ये सामावेश करण्याचा सरकारचा डाव आहे. हा सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू.”

ओबीसी समाज रस्यावर येणार नाही, असं सरकारने समजु नये. मरणाची लढाई लढण्याची वेळ आली तरी चालेल. परंतू ओबीसी आरक्षणाचे संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. ओबीसी समाज शांत बसणार नाही. आमची ताकद आम्ही मतपेटीतून दाखवून देऊ, असं शेंडगे म्हणाले.

महात्त्वाच्या बातम्या – 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश! 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!